१७ वा राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त सेवासदन प्रशालेत बालिका संवाद कार्यक्रम उत्साहात

  • उज्ज्वल भविष्यासाठी मुलींना सक्षम करूया
  • बाल विकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले यांचे प्रतिपादन

कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर :  देशातील मुलींचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल, तर त्यांना सक्षम करणे ही काळाची गरज आहे. मुली सक्षम तेव्हाच होऊ शकतात, जेव्हा कुटुंब, समाज आणि सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. बालिका ही कुटुंबाची आणि समाजाची जबाबदारी आहे, हे मानून त्यांच्यावर विश्वास ठेवणे आणि त्यांना समान संधी दिली पाहिजे, असे प्रतिपादन बाल विकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले यांनी   येथे केले. राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो सोलापूर यांच्या वतीने सु.रा. मुलींची प्रशाला, सेवासदन येथे बालिका संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी  भोसले बोलत होते.
यावेळी सहाय्यक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव, बाल सरंक्षण अधिकारी रेश्मा गायकवाड, मुख्याध्यापिका राजश्री रणपिसे, माजी अधिकारी सतीश घोडके, पर्यवेक्षक स्वाती पोतदार, विस्तार अधिकारी ऋषिकेश जाधव आदी उपस्थित होते. यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली.

रेश्मा गायकवाड म्हणाल्या की, राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून, मुलींच्या आकांक्षा आणि मेहनतीने समाजाला प्रेरणा मिळत आहे. मुलींनी शिक्षण आणि विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीमुळे समाजात सकारात्मक बदल होत आहे. आजच्या मुली ही फक्त घरासाठी नव्हे, तर देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मुलींच्या स्वप्नांना पाठबळ देऊन त्यांना यशस्वी करण्यासाठी पालक, शिक्षक आणि समाजाने सातत्याने प्रयत्नशील राहावे.
मुख्याध्यापिका रणपिसे यांनी सेवासदन संस्थेच्या संस्थापिका तथा थोर महिला समाजसुधारक रमाबाई रानडे यांनी महिलांच्या सामाजिक सुधारणाविषयी केलेल्या कार्याची माहिती दिली.
देशातील मुलींना सक्षम, शिक्षित आणि स्वावलंबी बनवणे हा राष्ट्रीय बालिका दिनामागचा खास उद्देश असून देशातील मुलींना त्यांचे अधिकार आणि हक्क यांबाबत जागृत करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून बेटी बचाओ बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, उडान, किशोरवयीन सक्षमीकरण योजना, मिशन वासल्य, पोषण अभियान, विविध क्रीडा व शैक्षणिक उपक्रम आणि योजनांच्या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरण होत आहे, असे अंबादास यादव यांनी प्रास्तविकेतून सांगितले. सूत्रसंचालन आणि आभार दिपाली बोरसे यांनी केले. बालिका दिनानिमित्त विद्यार्थीनीसाठी मला अपेक्षित असेलेला भारत देश, सुकन्या समृद्धी योजनेचे १० वर्ष, विकसित भारतामध्ये महिलांचे योगदान विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आले होते. स्पर्धेचे परीक्षण लक्ष्मी विश्वेश्वर कमळे, दिपाली संजय बोरसे, मीरा राहुल राक आणि स्वप्ना पुष्कराज केळकर यांनी केले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.  कार्यक्रमासाठी कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, सूरज जाधव, शशीकांत यादव, रोहित यादव, शिपाई स्वाती माने आदींनी परिश्रम घेतले.

संवाद, प्रतिज्ञा, निबंध, प्रश्नमंजूषा स्पर्धा आणि पारितोषिक वितरण; विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे-

प्रथम क्रमांक स्नेहा गुरुनाथ नलावडे, द्वितीय धनश्री गणेश साळुंखे, तृतीय विजयालक्ष्मी विकास झांबरे, उत्तेजनार्थ पायल हरी जगताप आणि कांचन विष्णु पाटील. प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे- मिस्बाह अब्दुल कादर मुजावर, भाग्यलक्ष्मी काशिनाथ दोडमनी, प्रज्ञा विशाल कांबळे, तनुजा शरद पवार, विजयालक्ष्मी विकास झांबरे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact