मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांनी प्रस्ताव दाखल करावेत;

इतर मागास बहुजन कल्याणच्या सहायक संचालक  मनिषा फुले यांची माहिती

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकीय अनुदानित, विना अनुदानित, कायम अनुदानित शाळांची त्यांच्या शाळेत शिक्षण घेत असलेलया इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विमुक्त जाती भटक्या जमाती,  इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे सर्व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे प्रस्ताव तालुक्यातील शाळांनी संबधित  पंचायत समितीकडे दाखल करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणच्या सहायक संचालक  मनिषा फुले यांनी केले आहे.

शासन निर्णयानुसार व विहीत प्रपत्रात सन २०२४-२५ चे प्रस्ताव सादर करण्यात यावे. सोलापूर शहरातील प्राथमिकचे प्रस्ताव प्रशासन अधिकारी सोलापूर मनपा शिक्षण मंडळ सोलापूर यांच्या कार्यालयास व सोलापूर शहरातील माध्यमिक शाळांचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्काया र्यालयास सादर करण्यात यावेत.

विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांकरीता मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना यापूर्वी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या कार्यालयामार्फत राबविण्यात येत होते. दि. १० डिसेंबर २०२४  व शासन शुध्दीपत्रक दि. २६ डिसेंबर २०२४  अन्वये सदरची योजना सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करून सदर विभागाकडून ही योजना सन २०२४-२५ या वर्षापासून कार्यान्वित झाली असल्याचेही इतर मागास बहुजन कल्याणच्या सहायक संचालक फुले यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact