शासकीय योजनांची माहिती, समस्यांचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन सेवा सुरू
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : विविध शासकीय योजनांची माहिती आणि आपल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची व्हॉट्सअँप हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली असून, हेल्पलाईन नंबर ९८६१७१७१७१ असा आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार आणि कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशान्वये राज्यातील विविध शासकीय योजनांची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांना सहाय्य करण्यासाठी, जनसामान्यांच्या समस्येचे निराकरणासाठी ही हेल्पलाईन सेवा सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने महा राष्ट्रवादी व्हॉट्सअँप हेल्पलाइन नंबर ९८६१७१७१७१ प्रत्यक्षात अंमलात आणला आहे. याचा प्रचार व प्रसार स्थानिक पातळीवर व्हावा आणि जनसामान्यांना त्याचा लाभ घेता यावा, उद्देशाने सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ही हेल्पलाईन सेवा सुरु केलेली आहे. सोलापूरकरांनी कोणतीही माहिती हवी असल्यास किंवा आपली समस्या थेट व्हॉट्सअँपच्या माध्यमातून नोंदवावी. या हेल्पलाइनवर महा राष्ट्रवादीची टीम सतत लक्ष ठेवून निरीक्षण करीत आहे. आपल्या प्रश्नाला तत्काळ रिप्लाय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.
=======================================================================
ही हेल्पलाइन वापरताना खालील टिप्स फॉलो करा :
- या नंबरवर ९८६१७१७१७१ व्हॉट्सअँप करा.
- त्यानंतर तुमची भाषा, जिल्हा, मतदारसंघ, लिंग आदींची निवडा
- ज्या योजनेची माहिती हवी असेल ती योजना निवडा
- योजनेबद्दल समस्या असल्यास ‘मदत’ हा पर्याय निवडा
- स्मस्येनुसार पर्यायाची पुष्टी करा
- यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल
- यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याशी संपर्क साधेल
================================================================================
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या हेल्पलाईन व्हॉट्सअँप क्रमांक ९८६१७१७१७१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार, जुबेरभाई बागवान यांच्यावतीने करण्यात आल आहे.
या पत्रकार परिषदेस जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, शहर उत्तर विधानसभा संघटक प्रकाश झाडबुके, सोशल मिडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, कांचन पवार, सुरेखा घाडगे यांची उपस्थिती होती.