सोलापूर परिसरात पावसाची रिपरिप सुरूच
By Kanya News||
सोलापूर : सोलापूर शहर व परीसरात सोमवारी (दि. २२ जुलै ) रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. कमी अधिक प्रमाणात शहर परिसर व जिल्ह्यात पाऊस सुरूच होता. दरम्यान, रविवारी मात्र थोडासा उघडीप दिल्यानंतर सोमवारी पुन्हा पावसाने हजेरी लावली. पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लाऊन सर्वाना दिलासा दिला आहे. खास करून शेतकरी वर्गाना. मृग नक्षत्राच्या पावसानंतर पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने शनिवारी शहरात सकाळपासून हजेरी लावली. जरी दिवसभर पाऊस सुरु असला तरी पावसाचा जोर मात्र कमी होता. केवळ संततधार सुरु असल्याने अनेकांची तारांबळ उडाली.
सोमवार, दि. २२ जुलै रोजी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस मंगळवेढा तालुक्यात नोंद झाली आहे. मंगळवेढा शहरात २०२. ८ मिली सरासरीने २७९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर मारापूर येथे १८१. ६ च्या सरासरीने २४९. ८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.