विभागीय रेल्वे प्रबंधक नीरज कुमार दोहरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
by kanya news||
सोलापूर : मध्य रेल्वेतील सोलापूर विभागाच्यावतीने उत्कृष्ट कामगिरी केलेल्या एकूण ४३ कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलच्या प्रांगणात दि. १५ ऑगस्ट रोजी ७८ वा स्वतंत्रता दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यावेळी हा सन्मान करण्यात आला. विभागीय रेल्वे प्रबंधक नीरज कुमार दोहरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात रेल्वे सुरक्षा बल, स्काउट एंड गाइड, सिव्हिल डिफेन्सच्या पथकाद्वारे परेडचे प्रदर्शन करण्यात आले. दोहरे यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक स्वतंत्र दिवसाचा संदेशाचे वाचन केले. विभागीय सांस्कृतिक अकादमीद्वारा देशभक्ती गीतांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात सोलापूर महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्षा सरिता दोहरे, उपाध्यक्षा निभा कुमारी, महिला कल्याण संघटनाचे अन्य सदस्या, अपर मंडल रेल प्रबंधक अंशुमाली कुमार, सर्व विभागाचे अधिकारी, मान्यता प्राप्त युनियन/असोसिएशनचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
बाल विकास मंदिर प्रशालेमध्ये महिला संघटनच्या अध्यक्षा सरिता दोहरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सोलापूर विभागाच्या स्काऊट अँड गाईडच्या तुकडीद्वारे विविध प्रदर्शन स्काऊट डेन मध्ये करण्यात आले. सिव्हिल डिफेन्सच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन देखील करण्यात आले. डॉ. कोटणीस रेल्वे हॉस्पिटलमधील असलेल्या रुग्णांना महिला कल्याण संघटनेद्वारे उपहार वाटण्यात आले. त्यानंतर रेल विहार या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.