सोलापूर विभागातून धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांच्या कोच संरचनेतमध्ये बदल

By Kanya News ।।

सोलापूर : सोलापूर विभागातून धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांच्या कोच संरचनेतमध्ये बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
गाडी क्र. ११०१९/११०२० छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- भुवनेश्वर -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेसची वर्तमान संरचना १ प्रथम श्रेणी वातानुकूलित, २ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ६ तृतीय श्रेणी वातानुकूलित, ९ स्लीपर, २ जनरल २ गार्ड ब्रेक वॅन एकूण २२ कोच होते. सुधारित संरचनेनुसार यात बदल केले असून, त्यानुसार १ प्रथम श्रेणी वातानुकूलित,२ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ६ तृतीय श्रेणी वातानुकूलित, ७ स्लीपर, ४ जनरल २ गार्ड ब्रेक वॅन एकूण २२ कोच असतील. परिवर्तित दि. १ डिसेंबर २०२४ रोजी गाडी क्र.११०१९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- भुवनेश्वर एक्सप्रेस तर दि. ३ डिसेंबर २०२४ रोजी गाडी क्र. ११०२० भुवनेश्वर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेसमध्ये परिवर्तन करण्यात येईल.

Image Source


=========================================================================================================

गाडी क्र.२२१५९/२२१६० छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- चेन्नई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेसची वर्तमान संरचनेनुसार २ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ७ इकॉनॉमी वातानुकूलित, २ स्लीपर, ३ जनरल २ गार्ड ब्रेक वॅन असे एकूण १६ कोच होते. त्यात बदल करण्यात येत असून, सुधारित संरचनेत २ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ६ इकॉनॉमी वातानुकूलित, २ स्लीपर, ४ जनरल २ गार्ड ब्रेक वॅन एकूण १६ कोच असतील. परिवर्तित : दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी गाडी क्र.२२१५९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- चेन्नई एक्सप्रेस तर दि. ७ डिसेंबर २०२४ रोजी गाडी क्र. २२१६० चेन्नई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस मध्ये परिवर्तन करण्यात येईल.
==========================================================================================================

गाडी क्र. ११०१७/११०१८ लोकमान्य टिळक टर्मिनस- करैकल – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसच्या वर्तमान संरचनेत १ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ७ तृतीय श्रेणी वातानुकूलित, ९ स्लीपर, ३ जनरल, २ गार्ड ब्रेक वॅन असे एकूण २२ कोच होते. सुधारित संरचनेनुसार आता २ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ६ तृतीय श्रेणी वातानुकूलित, ८ स्लीपर, ४ जनरल, २ गार्ड ब्रेक वॅन असे एकूण २२ कोच असतील. परिवर्तित: दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी गाडी क्र. ११०१७ लोकमान्य टिळक टर्मिनस- करैकल एक्सप्रेस तर दि. २ डिसेंबर २०२४ रोजी गाडी क्र. ११०१८ करैकल – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस मध्ये परिवर्तन करण्यात येईल.
==========================================================================================================

गाडी क्र. ११०१३/११०१४ लोकमान्य टिळक टर्मिनस- कोयम्बतूर -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसच्या वर्तमान संरचनेत १ प्रथम श्रेणी वातानुकूलित, २ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ६ तृतीय श्रेणी वातानुकूलित, १ पेंट्रीकार, ८ स्लीपर, २ जनरल, २ गार्ड ब्रेक वॅन असे एकूण २२ कोच होते. सुधारित संरचनेनुसार १ प्रथम श्रेणी वातानुकूलित, २ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ६ तृतीय श्रेणी वातानुकूलित, १ पेंट्रीकार, ६ स्लीपर, ४ जनरल, २ गार्ड ब्रेक वॅन असे एकूण २२ कोच असतील. परिवर्तित: दि. १ डिसेंबर २०२४ रोजी गाडी क्र.११०१३ लोकमान्य टिळक टर्मिनस- कोयम्बतूर एक्सप्रेस तर दि. ३ डिसेंबर २०२४ रोजी गाडी क्र. ११०१८ कोयम्बतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसमध्ये परिवर्तन करण्यात येईल.
==========================================================================================================

गाडी क्र. २२१०१/२२१०२ लोकमान्य टिळक टर्मिनस- मदुराई- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसच्या वर्तमान संरचनेत १ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ७ तृतीय श्रेणी वातानुकूलित, ९ स्लीपर, ३ जनरल, २ गार्ड ब्रेक वॅन असे एकूण २२ कोच होते. सुधारित संरचनेत २ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ६ तृतीय श्रेणी वातानुकूलित, ८ स्लीपर, ४ जनरल, २ गार्ड ब्रेक वॅन असे एकूण २२ कोच असतील. परिवर्तित: दि. ४ डिसेंबर २०२४ रोजी गाडी क्र २२१०१ लोकमान्य टिळक टर्मिनस- मदुराई एक्सप्रेस तर दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी गाडी क्र. ११०१८ मदुराई – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसमध्ये परिवर्तन करण्यात येईल.
=========================================================================================================

गाडी क्र. २२१७९ /२२१८० लोकमान्य टिळक टर्मिनस- चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसच्या वर्तमान संरचनेत २ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ६ तृतीय श्रेणी वातानुकूलित, १ पेंट्रीकार, ८ स्लीपर, ३ जनरल, २ गार्ड ब्रेक वॅन असे एकूण २२ कोच होते. सुधारित संरचनेत २ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ६ तृतीय श्रेणी वातानुकूलित, १ पेंट्रीकार, ७ स्लीपर, ४ जनरल, २ गार्ड ब्रेक वॅन असे एकूण २२ कोच असतील. परिवर्तित: दि. २ डिसेंबर २०२४ रोजी गाडी क्र.२२१७९ लोकमान्य टिळक टर्मिनस- चेन्नई एक्सप्रेस तर दि. ३ डिसेंबर २०२४ रोजी गाडी क्र. २२१८० चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसमध्ये परिवर्तन करण्यात येईल.
=========================================================================================================

गाडी क्र. १२१६३/1१२१६४ लोकमान्य टिळक टर्मिनस- चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसच्या वर्तमान संरचनेत २ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ६ तृतीय श्रेणी वातानुकूलित, १ पेंट्रीकार, ८ स्लीपर, ३ जनरल, २ गार्ड ब्रेक वॅन असे एकूण २२ कोच होते. सुधारित संरचनेत २ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ६ तृतीय श्रेणी वातानुकूलित, १ पेंट्रीकार, ७ स्लीपर, ४ जनरल, २ गार्ड ब्रेक वॅन असे एकूण २२ कोच असतील. परिवर्तित: दि. १ डिसेंबर २०२४ रोजी गाडी क्र.१२१६३ लोकमान्य टिळक टर्मिनस- चेन्नई एक्सप्रेस तर दि. २ डिसेंबर २०२४ रोजी गाडी क्र. १२१६४ चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसमध्ये परिवर्तन करण्यात येईल.
========================================================================================================

गाडी क्र.१२११५/१२११६ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सोलापूर -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आणि गाडी क्र.११३०१/११३०२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -बंगळुरू-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या वर्तमान संरचनेत १ प्रथम श्रेणी वातानुकूलित, ३ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ३ तृतीय श्रेणी वातानुकूलित, २ इकॉनॉमी वातानुकूलित, ८ स्लीपर, ३ जनरल २ गार्ड ब्रेक वॅन असे एकूण २२ कोच होते. सुधारित संरचनेत १ प्रथम श्रेणी वातानुकूलित,२ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ६ तृतीय श्रेणी वातानुकूलित, ७ स्लीपर, ४ जनरल २ गार्ड ब्रेक वॅन असे एकूण २२ कोच असतील. परिवर्तित: दि. १ डिसेंबर २०२४ रोजी गाडी क्र. १२११५ सोलापूर -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस तर दि. ४ डिसेंबर २०२४ रोजी गाडी क्र. १२११६ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सोलापूर एक्सप्रेस आणि दि. २ डिसेंबर २०२४ रोजी गाडी क्र. ११३१०१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -बंगळुरू एक्सप्रेस तर दि. ३ डिसेंबर रोजी बंगळुरू- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये परिवर्तन करण्यात येईल.
=========================================================================================================

गाडी क्र.११३११/११३१४ सोलापूर – हसन- सोलापूर एक्सप्रेसच्या वर्तमान संरचनेत १ प्रथम श्रेणी वातानुकूलित, ३ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ३ तृतीय श्रेणी वातानुकूलित, ९ स्लीपर, ३ जनरल २ गार्ड ब्रेक वॅन असे एकूण २१ कोच होते. सुधारित संरचनेत १ प्रथम श्रेणी वातानुकूलित, २ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ६ तृतीय श्रेणी वातानुकूलित, ७ स्लीपर, ४ जनरल २ गार्ड ब्रेक वॅन असे एकूण २२ कोच असतील. परिवर्तित: दि. १ दिसेम्बर रोजी गाडी क्र. ११३११ सोलापूर -हसन तर दि. २ डिसेंबर २०२४ रोजी गाडी क्र. ११३१४ हसन – सोलापूर एक्सप्रेसमध्ये परिवर्तन करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact