गाडीत विसरलेली महिला प्रवाशीची बॅग केली परत
by kanya news||
सोलापूर : मुंबईहून सिद्धेश्वर एक्सप्रेसने सोलापूरकडे निघालेल्या एका महिला प्रवाशीची बॅग गाडीतच विसरली. एसी कोच अटेंडंट महेश येमूल यांना ती बॅग सापडली. त्यांनी ती बॅग आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने त्या महिला प्रवाशीला प्रामाणिकपणे परत केली. त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रवाश्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली आहे. त्याचीच प्रचिती म्हणून रेल्वे कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवत प्रवाशाचा ऐवज मिळवून दिला आहे.
सपना कोळी या (ट्रेन क्रमांक १२११६) सिद्धेश्वर एक्सप्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सोलापूरकडे प्रवास करीत होत्या. या गाडीने त्या (एच१-एफ कूपा सीट क्रमांक १५) प्रवास करीत होत्या. सोलापूर रेल्वे स्थानकावर उतरत असताना त्यांची बॅग सीटवरच विसरली. दरम्यान, कर्तव्यावर स्थित असणाऱ्या सोलापूर रेल्वे विभागातील कर्मचारी एच वन कोचचे एसी कोच अटेंडंट (एसीसीए) महेश येमूल यांना ती मिळाली. त्यांनी ती बॅग वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता रामलाला प्यासे व वरिष्ठ खंड अभियंता (कॅरेज अँड वेगन-डेपो इनचार्ज-सोलापूर) आणि ज्युनिअर यांच्या उपस्थितीत संबंधित प्रवासी सपना कोळी यांनी परत केली. त्या पर्समध्ये ३० हजार रुपयांची रोकड होती. आयडी कार्डही होते. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रती आपली क्रुतज्ञता व्यक्त करीत सपना कोळी यांनी सर्व टीमचे आभार मानले.
यावेळी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता रामलाला प्यासे यांच्याकडून या सर्व कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.