सोलापूर रेल्वे : रेल्वे सुरक्षा (आरपीएफ) विभागाची उल्लेखनीय कामगिरी
By kanya News||
सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने, विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रेल्वे विभागीय सुरक्षा आयुक्त आदित्य यांच्या देखरेखीखाली सुरक्षा विभागाने एप्रिल – जुलै २०२४ दरम्यान महत्वपूर्ण कार्य केले आहे. रेल्वेकडून अंमली पदार्थ तस्करीविरुद्ध मोहीम राबवून २ गुन्हे उघडकीस आणून एकूण ३.८ लाख रुपये किमतीचा ५८ किलो गांजा जप्त करण्यात आला. जप्त करून आवश्यक कारवाईसाठी जीआरपीकडे सोपवले आहे.
घरातून पळून गेलेल्या एकूण २० मुलांची (१४ मुले आणि ६ मुली) रेल्वे सुरक्षा विभागाने सुटका केली. महिला व बाल संरक्षण समितीकडे सुपूर्द केले तेथून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. प्रवाशांचे सामान चोरी करणाऱ्यांविरुद्ध रेल्वे सुरक्षा विभागाने सखोल मोहीम राबवून “यात्री सामानाची चोरी” थेफ्ट ऑफ प्यासेन्जर बिलोन्गिंगची (टीओपीबी) एकूण २३ प्रकरणे उघडकीस आली असून, २९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. रेल्वे गाड्यांमध्ये मालाची विक्री करणाऱ्या अवैध फेरीवाले/विक्रेत्यांवर मोहीम राबवून एकूण ८३३ अवैध फेरीवाल्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांच्याकडून एकूण ७.४९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.