MCA चे संयुक्त सचिव संतोष बोबडे, CAC चेअरमन सचिन मुळे, मनपा उपायुक्त आशिष लोकरे,माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते पूजन
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित डी.बी. देवधर चषक स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले. या वर्षापासून वरिष्ठ गटाच्या मुलांचसाठी नव्याने डी.बी. देवधर चषक स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. याचे उद्घाटन शनिवार, दि. ५ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे (MCA) संयुक्त सचिव संतोष बोबडे, (CAC) सीएसी चेअरमन सचिन मुळे, सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप माने तसेच सोलापूर मनपा उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते खेळपट्टी व यष्ट्यांची पूजा करून करण्यात आले.
यावेळी MCA अपेक्स कौन्सिल सदस्य तथा सामना समिती प्रमुख राजू काणे, अजय देशमुख, राजमाता अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाचे चिलवंत, सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सू , MCA आजीवन सदस्य दिलीप बच्चुवार, सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी प्रकाश भुतडा, राजेंद्र गोटे, संतोष बडवे, संजय वडजे, उदय डोके, संजय मोरे, मोहन बारड, स्नेहल जाधव, किरण मणियार, किशोर बोरामणी, मिलिंद गोरे, राजू रंगम, सारिका कुरनूरकर, रणजी निवड समिती प्रमुख अक्षय दरेकर, रोहित जाधव, किरण आढाव, अमेय श्रीखंडे, संघ व्यवस्थापक मंदार देडगे, चार संघाचे प्रशिक्षक अमित पाटील, सत्यजीत जाधव, दिगंबर वाघमारे, अमित कुष्ते आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच स्व.वसंत रांजणे, स्व.हेमंत कानिटकर या संघाचे खेळाडू, सोलापुरातील विविध क्रिकेट क्लबमधील खेळाडू,क्रीडा प्रेमी, पालक, महिला सदस्य उपस्थित होते.
प्रास्ताविक सोलापूरचे BCCI पंच अनिश सहस्रबुद्धे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत SDCA अध्यक्ष दिलीप माने यांच्या हस्ते सचिन मुळे यांच्यासह MCA अपेक्स कौन्सिल सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. CAC चेअरमन सचिन मुळे यांनी यावेळी उपस्थितांना ही स्पर्धा सुरू करण्यामागचा उद्देश संगितला. सामने सोलापुरात का घेतले याचे श्रेय, महत्व सांगितले. सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे कायम लाभणारी सहकार्य, मदत तसेच इंदिरा गांधी पार्क स्टेडियमचे वैशिष्ट्य आणि नुकतेच सोलापूर मनपाच्यावतीने स्टेडियम हे पुढील ३० वर्षासाठी MCA ला दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सू यांनी देखील स्पर्धा आयोजनाची संधी सोलापूरला दिल्याबद्दल MCA चे आभार मानले.
डी.बी. देवधर चषक स्पर्धेतील सामने इंदिरा गांधी पार्क स्टेडियमसोबतच दयानंद कॉलेजच्या मैदानावर देखील होणार आहेत. तीन दिवसीय एकूण सहा सामने होणार आहेत. सामना समिती प्रमुख तथा या स्पर्धेचे MCA कडून आयोजक म्हणून राजू काणे यांनी स्व. सदू शिंदे, सदानंद मोहोळ हे दोन संघ असल्याचे सांगितले. या स्पर्धेतील खेळाडूंची निवड ही गेल्या वर्षीच्या महाराष्ट्र वरिष्ठ, २३ व १९ वर्षाखालील संघातून केली असल्याचे सांगितले. ज्यांनी मागील सिझनमध्ये BCCI च्या विविध स्पर्धेत तसेच MCA इन्व्हिटेशन स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती,अशा ७० खेळाडूंची ४ संघात विभागणी करण्यात आली आहे. त्या संघाना महाराष्ट्राचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू यांची नावे देण्यात आली आहेत. या स्पर्धेतील सामन्यासाठी MCA चे पॅनल पंच व गुणलेखक काम पाहणार आहेत. आजपासून नवीन माने, नंदकुमार टेळे, पृथ्वीराज गांगजी, चिराग शहा, प्रसाद शावंतूल, गेनबा सुरवसे हे तीन दिवस चालणाऱ्या सामन्यात काम पाहत आहेत. उद्घाटन सोहळ्यात सामन्याची नाणेफेक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. दोन्ही संघातील खेळाडूंची ओळखदेखील करून देण्यात आली. सदर सामने MCA च्या अधिकृत युट्यूब चॅनेल वर दाखविण्यात येणार असल्याचे MCA च्यावतीने कळविण्यात आले आहे. ऑनलाईन स्कोअरदेखील MCA Scores या अधिकृत ॲपवर पाहता येणार आहे.
आजचे सामने :
(पार्क स्टेडियम) :
फलंदाजी : वसंत रांजणे ईलेव्हन: ७७ षटकात सात बाद २९३ धावा. अनिरुद्ध साबळे ९२ धावा, शमशूझमा काझी नाबाद ४५ धावा, ऋषिकेश दौंड नाबाद ३२, हर्ष मोगावीरा २४ धावा.
गोलंदाजी: राजवर्धन हंगरगेकर ५३ धावात तीन बळी. सुमित मारकली, नचिकेत ठाकूर, सोहन जमाले, शिवराज शेळके प्रत्येकी एकेक बळी.
(दयानंद कॉलेज ग्राउंड):
फलंदाजी: सदानंद मोहोळ ईलेव्हन : ७८.५ षटकात सर्वबाद ३२६ धावा. मिझान सय्यद नाबाद १२१, दिग्विजय पाटील ४४, मंदार भंडारी ५७, सत्यजित बच्छाव ३८ धावा. गोलंदाजी: मनोज इंगळे ३९ धावात तीन बळी, अक्षय वाईकर ४१ धावात दोन बळी, निमीर जोशी ४८ धावात दोन बळी, आतिश राठोड २० धावात एक बळी, प्रत्युत्तरात सदू शिंदे ईलेव्हन : ७ षटकात १ बाद ११ धावा. श्रीपाद निंबाळकर नाबाद ३ धावा, सिद्धांत दोशी नाबाद दोन बळी. गोलंदाजी: नदीम शेख २ धावात एक बळी.