पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ रविवार, दि. २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.१५ वाजता पोलीस परेड ग्राऊंड, पोलीस आयुक्त मुख्यालय, सोलापूर येथे राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे. तरी या समारंभास मान्यवर नागरिक, स्वातंत्र्य सैनिक तसेच शासकीय-निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित रहावे असे, आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.