पालकमंत्र्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : नियोजन भवन इमारतीमधील पहिल्या मजल्यावर पालकमंत्री यांच्यासाठी कार्यालय तयार करण्यात आलेले असून, या कार्यालयाचे उद्घाटन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी कार्यालयाची पाहणी केली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, महापालिका आयुक्त शीतल उगले-तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आदी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांची जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट- पाहणी:
राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली आणि कार्यालयाची सविस्तर पाहणी केली.
पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच गोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची रचना सांगून प्रत्येक शाखेच्या अधिकाऱ्याची व त्यांच्या कामकाजाची माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर अभ्यागतासाठी स्वतंत्र अभ्यागत कक्ष तयार करण्यात आलेला असून, त्या कक्षा ही पाहणी पालकमंत्री यांनी केली.
यावेळी महापालिका आयुक्त शीतल उगले-तेली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह महसूल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.