उपाध्यक्षपदी कदम, जहागीरदार, सचिवपदी कोनापुरे यांची निवड

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर: शहरातील विविध भागात कार्यरत ज्येष्ठ नागरिक संघटनांमध्ये समन्वय साधण्यासाठी सक्रिय असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघटना संयुक्त शिखर समितीच्या अध्यक्षपदी प्रा. विलास मोरे यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी अरुण कदम, जयश्री जहागीरदार तर सचिवपदी मन्मथ कोनापुरे यांची एकमताने निवड झाली.

डफरिन चौकातील सारस्वत ब्राम्हण मल्टिपर्पज सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या बैठकीस शहरातील विविध भागात कार्यरत असलेल्या १६ ज्येष्ठ नागरिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

समितीच्या कार्यकारी मंडळाचे सन्माननीय सदस्य म्हणून सोलापुरातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघटनांचे विद्यमान अध्यक्ष व सचिव यांना स्थान देण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. यात दोन महिला सदस्य असणेही अनिवार्य करण्यात आले. मुख्य समन्वयकपदी गुरुलिंग कन्नूरकर  यांची निवड झाली. जिल्हाधिकारी व समाजकल्याण कार्यालयाद्वारा संचलित  ज्येष्ठ नागरिक संनियंत्रण समितीचे नियुक्त अशासकीय सदस्य महादेव माने यांची  प्रमुख सल्लागार म्हणून  निवड करण्यात आली.  स्वागत व प्रास्ताविक गुरुलिंग कन्नूरकर यांनी  केले. मन्मथ कोनापुरे यांनी  विषय पत्रिकेचे वाचन केले. आभार प्रदर्शन पुरुषोत्तम बगले यांनी केले.

 नूतन  पदाधिकारी पुढीलप्रमाणे…

  • अध्यक्ष: प्रा. विलास मोरे
  • उपाध्यक्ष:  अरुण कदम, जयश्री जहागीरदार.
  • सचिव:  मन्मथ कोनापुरे
  • सहसचिव:  डॉ. चन्नय्या स्वामी, सिद्राम सनके.
  • कोषाध्यक्ष:  प्रा. कृष्णात देवकर.
  • सहकोषाध्यक्ष: बाळासाहेब पाटील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact