प्रत्येक व्यक्तीने कायद्याचा आदर केलाच पाहिजे : अँड. निता मंकणी
By Kanya News |
सोलापूर : समाजात राहत असताना प्रत्येक व्यक्तीने कायद्याचा आदर केला पाहिजे. कायद्याच्या पुढे कुठलाही माणूस मोठा नाही, असे मत अँड. निता मंकनी यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून भारतीय जैन संघटनेच्यावतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी अँड. श्रीयंक मंकनी, अँड. प्रेम मंकणी (सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली) यांनाही पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मंकणी, भारतीय जैन संघटनेचे श्याम पाटील, चंद्रप्रभू जैन मंदिर कुमठेचे वालचंद पाटील यांची उपस्थिती होती.