नऊ दिवसीय प्रथम ज्योतिर्लिंग सोरटी सोमनाथ, द्वारका धाम, गिरनार यात्रा दर्शन;
जगन्नाथ पुरीसह अन्य धार्मिक स्थळांची सात दिवसीय यात्रा
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : महाराष्ट्र शासनाने आता ६० वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना आणली आहे. ज्येष्ठांसाठी मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना ही पूर्णपणे मोफत आहे. यासाठी ६० वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्य समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय समाज कल्याण विभागाची ही ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना आहे.
महाराष्ट्र राज्य समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय समाज कल्याण विभाग आणि सोलापुरातील रुद्रसेना यात्रा परिवाराच्या विद्यमाने वयाची साठ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेच्या माध्यमातून प्रथम ज्योतिर्लिंग सोरटी सोमनाथ, द्वारका धाम व गिरनार यात्रा दर्शन घडविण्यात येणार आहे.
१२ ज्योतिलिंगापैकी पहिले ज्योतिलिंग सौराष्ट्र सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन व चार मुख्य धाममधील एक धाम द्वारका धाम भालकातिर्थ ( भगवान श्री कृष्णांनी शरीर सोडलेले ठिकाण रुक्मिणी मंदिर), गोपी तलाव, भेट द्वारका, नागेश्वर ज्योतिलिंग, पृथ्वीवरील भूमीचे शेवटचे ठिकाण, गोमती नदी व समुद्र संगम, श्री कृष्ण देहोत्सर्ग, त्रिवेणी संगम, पांडव गुफा व गिरनार दत्त चरण पादुका असे हे सर्व पावन पुण्य मोक्षदायक अध्यात्मिक, धार्मिक तिर्थ ९ दिवसीय यात्रा आयोजित करण्यात आले आहे. यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणीची अंतिम तारीख दि. १८ नोव्हेंबर २०२४ आहे. नावनोंदणी रुद्र्सेना यात्रा परिवाराच्या रुपा स्वामी ( रुपाअक्का) ९५०३९१२३९९ आणि सिध्दू कुंभार ( ९०९६४२६३४५) यांच्याशी संपर्क साधावा.
==============================================================================
जगन्नाथ पुरीसह अन्य धार्मिक स्थळांची सात दिवसीय यात्रा
मोक्षदायिनी पुण्यदायक पवित्र भगवान श्री कृष्णाचे हृदय असलेले स्थान व मुख्य चारधामपैकी एक धाम विष्णुपीठ- जगन्नाथ पुरीसह जगप्रसिद्ध कोणार्क सूर्यमंदिर, भुवनेश्वर लिंगराज मंदिर, सिंहाचलम, अन्नावरम, पिठापुरम दर्शनीय यात्रा आयोजित केले आहे. ७ दिवसीय या यात्रेचा प्रवास रेल्वे आणि बसने असणार आहे. यात्रेकरूंसाठी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
================================================================
– आवश्यक कागदपत्रे –
१) २ पासपोर्ट साईज फोटो २) रेशन कार्ड झेरॉक्स २) आधारकार्ड झेरॉक्स ३) बँक पासबुक झेरॉक्स ४) अर्ज