स्व.मोहम्मद रफी यांची ४४ वी पुण्यतिथी; सरगम स्टुडिओतर्फे सदाबहार गीतांचे सादरीकरण

By Kanya News ।।

सोलापूर : सरगम स्टुडिओ सोलापूर प्रस्तुत स्व.मोहम्मद रफी यांच्या ४४ व्या पुण्यतिथीनिमित्त सदाबहार गीत-गायनाचे सादरीकरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक आरिफ एलाल आणि मनेजर कासिम शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.स्व.मोहम्मद रफी यांनी गायलेल्या सदाबहार गीत-गायनांचा कार्यक्रम मंगळवार, दि. ३० जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत/विनामुल्य आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार नरसय्या आडम, लुंजे बिल्डर्सचे जावेद लुंजे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदरच्या कार्यक्रमासाठी गायक म्हणून आरिफ एलाल, इमरान अली, मुस्तकीम एलाल, एस.एस.सैपन, अड. जैसवाल, जुबेर पटेल,बाबर, गायिका म्हणून प्लेबक सिंगर अनिता अय्यर, आम्रपाली लोखंडे, अल्फिया मुलाणी, जैसोफिया मुर्शद हे सुमधूर आवाजात गाणी सादर करणार आहेत. तसेच संगीत आमीर हुंडेकरी व त्यांचे सहकारी (स्टार्स ऑफ मेलोडी) हे देणार आहेत. या पत्रकार परिषदेस अनिल अय्यर, आम्रपाली लोखंडे, इम्रान अली, विठ्ठल गायकवाड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact