जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली

माझी वसुंधरा अभियानात सोलापूर जिल्ह्याचे  यश

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : माझी वसुंधरा अभियानात सोलापूर जिल्ह्याने विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियानात सोलापूर जिल्ह्याने हे   यश संपादन केले आहे.

राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्यावतीने माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत आपल्या कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या नगरपालिका व महानगरपालिका यांना विविध पुरस्कार दिले जातात. सोलापूर जिल्ह्याला विविध क्षेत्रात पुढील पुरस्कार प्राप्त झालेले असून सोलापूर जिल्ह्याने या अभियानात पुणे विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याची माहिती जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका विणा पवार यांनी दिली आहे.

================================================================================

 माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत  दि. २७ सप्टेंबर २०२४ रोजी राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका यांना विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले.  यामध्ये  सोलापूर जिल्ह्याने भरीव यश मिळवले आहे.

  • सोलापूर महानगरपालिका भूमी थिमॅटिक याच्या अंतर्गत दोन कोटी बक्षिसास पात्र ठरली आहे.
  • पंढरपूर नगर परिषद राज्यस्तरीय तृतीय क्रमांक मिळवून तीन कोटी रुपये बक्षीस पात्र ठरली आहे.
  • मोहोळ नगरपरिषद राज्यस्तरीय उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळवून दीड कोटी बक्षिसास पात्र ठरली आहे.
  • अकलूज नगर परिषद विभाग स्तरावर प्रथम येऊन ७५ लाख रुपये बक्षीसास पात्र ठरली आहे.
  • अनगर नगर पंचायत विभाग स्तर उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळवून ५० लाखाच्या बक्षीसास पात्र ठरली आहे.
  • माढा नगरपंचायत विभाग स्तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळवून ५० लाखाच्या बक्षिसास पात्र ठरली आहे.

================================================================================

 

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेतृत्वाखाली माझी वसुंधरा अभियानात सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा म्हणून सोलापूरला विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळालेला आहे. माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सोलापूर जिल्ह्याची विशेष बैठक घेतली. त्यांनी या बैठकांमध्ये मुख्याधिकाऱ्यांना हरित आच्छादनाचे प्रमाण वाढविणे, सायकल ट्रकचे प्रमाण वाढविणे, तसेच ई व्हेईकलचा वापर वाढवणे यावर विशेष भर देण्यास सांगितला होता. या अभियानाकरीता पुणे विभागाच्या सह आयुक्त पूनम मेहता, सह आयुक्त दत्तात्रय लांघी यांची विशेष मार्गदर्शन लाभले होते.

या अभियानासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वेळोवेळी बैठका घेऊन,  प्रशिक्षण सत्र आयोजित करून विविध स्पर्धा आयोजित करून व परीक्षेचा परिपूर्ण अभ्यास करून त्यात जास्तीत जास्त गुणांक मिळावे, याकरिता परीक्षा आयोजीत करून संपूर्ण जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती यांची स्पर्धेत उतरण्यासाठी पूर्ण तयारी करून घेतली होती.

संपूर्ण नगर पालिकेचे माझी वसुंधरा अभियान ४.० याकरिता  जिल्हा प्रशासन अधिकारी विणा पवार, सह आयुक्त, नगरपरिषद प्रशासन यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.  शहाजी चव्हाण यांनी याकरिता तांत्रिक तज्ञ म्हणून जिल्हा स्तरावरील कामगिरी पार पाडलेली आहे. या अभियानामध्ये जिल्हास्तरावरून पूर्ण वर्षभरात करावयाचे विविध कार्यक्रम व करावयाची कामे याचे वेळापत्रक आखून देण्यात आले होते.

यामध्ये जास्तीत जास्त झाडे लावणे, हरित पट्ट्याची निर्मिती करणे, वृक्ष गणनांना करणे ,प्लास्टिक पिशव्यांवर बंदी, शहरात चार्जिंग स्टेशन उभारणे, इलेक्ट्रिक वाहनांना चालना देणे, विहीर पुनर्भरण, एलईडी पथदिव्यांचा वापर, पर्यावरण संबंधी जनजागृतीचे विविध कार्यक्रम आयोजित करून व पर्यावरण पूरक, गणेशोत्सव, होळी, वटपौर्णिमा, दिवाळी हे कार्यक्रम हाती घेऊन शहरात वृक्षाच्या आच्छादनाचे प्रमाण वाढविणे, धुळीचे प्रमाण कमी करणे, भूगर्भिय पाण्याची पातळी वाढवणे असे पर्यावरण संतुलन राखणारे कामे हाती घेण्यात आली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायती या कामामुळे मोठे प्रमाणात गुणांक प्राप्त झाले.  म्हणूनच सोलापूर जिल्ह्याने विभाग स्तरावर माझी वसुंधरा ४.० या अभियानात प्रथम क्रमांक मिळवला आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याने चांगली कामगिरी करून दाखविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact