छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्यांचे संवर्धन;
अतिक्रमण काढण्यासाठी प्रशांत देशमुख करणार उपोषण
by kanya news ||
सोलापूर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्यांचे संवर्धन व जतन केले जावे तसेच किल्ल्यावरील अतिक्रमण हटविण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी प्रशांत देशमुख यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
एक मराठा लाख मराठा सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रथम मराठा आमरण उपोषणकर्ता प्रशांत सुधाकर देशमुख हे विविध मागण्यांसाठी पूनम गेटसमोर जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि.२२ ऑगस्ट २०२४ पासून आमरण उपोषणास बसणार आहेत. अशी माहिती प्रशांत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
======================================================================
या आहेत प्रमुख मागण्या..
- रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबई येथे अरबी समुद्रामधील भव्य स्मारक उभारण्यात यावे.
- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथे इंदू मीलमधील भव्य स्मारक त्वरित उभारावेत.
- जगतज्योती बसवेश्वर महाराज यांचे मंगळवेढा येथील भव्य स्मारकाची तातडीने निर्मिती व्हावी.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्यांचे संवर्धन, जतन करणे, प्रत्येक किल्यावरचे तत्काळ अतिक्रमण काढावेत.
==========================================================================
या चार विविध मागण्या शासन, प्रशासन यांच्याकडे लोकशाही मार्गाच्या आंदोलनातून पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. या मागण्या समाजासाठी हितकारक असून, शासन व प्रशासन यांनी त्वरीत मंजुर करुन त्यावर योग्य ती कारवाई करावी. तसे न झाल्यास या आंदोलनाला जन आंदोलनाचे स्वरुप द्यावे लागेल. सदर आमरण उपोषण करीत असताना आपल्या जिवितास कोणताही धोका निर्माण झाल्यास याला शासन, प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा प्रशांत देशमुख यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेस श्याम कदम, महेश आदी उपस्थित होते.