श्री माहेश्वर वैदिक मंडळातर्फे जानकी नगरात शिवदीक्षा व अय्याचार विधी कार्यक्रम
शोभा यात्रा, इष्टलिंग महापुजा, आशीर्वचन कार्यक्रमासाठी आमंत्रण
By Kanya News|
सोलापूर : श्री माहेश्वर वैदिक मंडळ, सोलापूर यांच्यावतीने सालाबादप्रमाणे सोमवारदि. २३ जुलै २०२४ ते शुक्रवार दि. २६ जुलै २०२४ पर्यंत श्री वीरशैव लिंगायत जंगम संस्कार केंद्र जानकीनगर, जुळे सोलापूर येथे महास्वामीजीची शोभा यात्रा, इष्टलिंग महापुजा, आशीर्वचन, शिवदीक्षा व अय्याचार विधी आदी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर आयोजित ज्ञानसिंहासनाधिश्वर काशी पीठ जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी व जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ.मल्लिकार्जून विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजीची शोभा यात्रा,
जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांची इष्टलिंग महपुजा, सायंकाळी आशीर्वचन आदी विविध धार्मिक कार्यक्रमासाठी महास्वामीजीना श्री माहेश्वर वैदिक मंडळ आमंत्रण देण्यात आले. यावेळी वैदिक मंडळाचे संस्थापक डॉ. शिवयोगी शास्त्री होळीमठ, उपाध्यक्ष कल्लय्या शास्त्री-गणेचारी, मंडळाचे संचालक बसय्या स्वामी-संभळ, सदस्य कार्तिक स्वामी-मठ, चन्नावीर शास्त्री-हिरेमठ, सिद्धय्या हिरेमठ, ईश्वर स्वामी-होळीमठ आदी उपस्थित होते.