महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ रणजी संभाव्य संघ सामना;
विदर्भाच्या पहिल्या डावात ८ बाद २३२ धावा
यश राठोडचे दमदार अर्धशतक; हितेश वाळुंजचे चार बळी
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर झालेला महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ रणजी संभाव्य संघातील दुसरा सराव सामना अनिर्णीत अवस्थेत संपला.विदर्भाने आपला डाव २ बाद ५४ वरून पुढे सुरू केला. नाबाद जोडीतील मंदार महाले यास आहे त्याच धावसंख्येवर रजनीश गुरबानीने त्रिफळाचित केले. त्यानंतर आलेला कर्णधार अक्षय वाडकर्णी, यश राठोडसोबत १०४ धावांची भागीदारी केली. त्यात १४४ चेंडूमध्ये यशने ५० धावा पूर्ण केल्या.
कर्णधार अक्षय अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना त्याला फिरकी गोलंदाज हितेशने स्वतःच्या गोलंदाजीवर टिपले. तत्पूर्वी हितेशनेच यश राठोडला ८० धावांवर माघारी धाडले.नंतर आलेला यश कदम (३२) शेवटपर्यंत नाबाद राहिला. सिद्धेश वाठ (११) याला सिद्धेश वीरने टिपले तर नचिकेत भुटे (१४) आणि पार्थ रेखाडे (००) यांना हितेशने लागोपाठ बाद करत सामन्यात चार बळी मिळवले.
तिसऱ्या दिवशी विदर्भाने ९२ षटके खेळत ८ बाद २३२ धावा केले, तेंव्हा खेळ थांबविला गेला त्यावेळी हर्ष दुबे नाबाद धावांवर राहिला. महाराष्ट्रकडून मुकेश चौधरी, रजनीश गुरबानी, रामकृष्ण घोष, सिद्धेश वीर यांनी प्रत्येकी एकेक बळी मिळविला.
सामन्यात बीसीसीआयचे पंच गणेश चरहाटे, अनीश सहस्त्रबुद्धे यांनी तर गुणलेखक म्हणून प्रसाद शावंतूल यांनी काम पाहिले.शेवटच्या दिवशी जेवणाच्यानंतर थोड्यावेळाने खूप जोराचा पाऊस झाला तरीदेखील सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मैदानावर देखभाल करणाऱ्या संघटनेचे विविध पदाधिकारी, ग्राउंड्समन यांच्या प्रयासाने थोड्याच वेळात पुन्हा खेळ सुरू झाला.यापुर्वीचा पहिला सामना महाराष्ट्राने जिंकला होता.