स्वागत सामाजिक संघटनेची मागणी
By Kanya News।।
सोलापूर : महाराष्ट्र राज्य शासनाच्या लाडला भाऊ योजनेचा लाभ सर्व कुटुंबातील १८ वर्षातील सर्व कुटुंबातील युवकांना शैक्षणिक अट न घालता देण्यात यावा, अशी मागणी स्वागत सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रीतम नरोटे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
महाराष्ट्रात लाडला भाऊ योजनेंतर्गत बारावी पास बेरोजगार युवकांना दरमहा ६ हजार रुपये व डिप्लोमा केलेल्या बेरोजगार युवकांना दरमहा ८ हजार रुपये तर पदवीधर बेरोजगार युवकांना १० हजार रुपये देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. परंतु महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबातील १८ वर्षाच्या पुढील सर्व बेरोजगार युवकांना सरसमान मुख्यमंत्री लाडला भाऊ योजनेचा लाभ सर्व कुटुंबातील युवकांना मिळावा. कारण महाराष्ट्रात जास्तीत जास्त ते त्यांच्या कौटुंबिक, आर्थिक परिस्थितीमुळे घेऊ शकले नाही. विशेषतः अशा युवकांनी सदर लाडका भाऊ योजनेचा लाभ कसा घ्यावा, म्हणून सरसकट सर्वांना याचा लाभ मिळाला पाहिजे. या पत्रकार परिषदेस सचिन लोखंडे, शिवानंद पुजारी, शिवा पुजारी, परशुराम राऊतराव आदी उपस्थित होते.