image source
खाशाबा जाधव यांचा दि. १५ जानेवारी हा दिवस जन्मदिन
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : ऑलिम्पिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा दि. १५ जानेवारी हा दिवस जन्मदिन आहे. त्यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. दिवगंत खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा हेलसिंकी १९५२ मध्ये वैयक्तीक क्रीडा प्रकारातील कुस्ती या क्रीडा प्रकारात भारताकडून खेळताना पहिले पदक (कांस्य) पटकावून देशाच्या क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे.
त्यांची आतंरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी राज्याला बहुमान तसेच नवोदित खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन दि. १५ जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १३ जानेवारी २०२५ सोलापूर जिल्ह्यातील “कुस्ती” खेळाचे सर्व माजी महाराष्ट्र केसरी, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू यांचा सत्कार, सोलापूर शहर तालीम संघद्वारा सोलापूर शहर महाराष्ट्र केसरी गादी व माती विभाग निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे सायंकाळी ५ वाजता सिध्देश्वर आखाडा, किल्ला बाग, सोलापूर येथे आयोजन करण्यात आले आहे. दि. १४ जानेवारी २०२५ रोजी “ऑलम्पिकवीर स्व. खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान” या विषयांवर सायंकाळी ४ वाजता श्रीकृष्ण कुस्ती केंद्र, सोलापूर येथे व्याख्यान आयोजित केले आहे.
दि. १५ जानेवारी २०२५ रोजी “ऑलिंपिक दौड” व रॅली तसेच जिल्ह्यातील सर्व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव-सत्कार, सकाळी ७ वाजता शासकीय मैदान नेहरूनगर, विजयपूर रोड, सोलापूर येथे करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यांनी कार्यालयीन वेळेत जाऊन आपली नांवे दि. १४ जानेवारी २०२५ पर्यंत नोंदवावीत. अधिक माहितीसाठी मैदानी राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश पवार (मोबाईल नं. ९९७००९५३१५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केलेले आहे.