कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे कुलदीप जंगम यांचा स्वागतपर सत्कार

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे भारतीय संविधानाची प्रत देऊन स्वागतपर सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील  सर्व शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले, विद्यार्थांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन सोलापूर जिल्हा गुणवत्तेच्या बाबतीत राज्यात अग्रेसर राहावे, यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी संघटनेसमोर व्यक्त केली.

याप्रसंगी कास्ट्राईब शिक्षक संगटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल कोरे, सचिव सोमलिंग कोळी, लक्ष्मण बनसोडे, सादिक तांबोळी, राहुल राठोड, पवन कांबळे, श्रीरंग बनसोडे, शिवानंद कोळी, बाबुराव गायकवाड, भीमाशंकर साबळे, संग्राम सोनकांबळे, मनोहर साबळे, बाळासाहेब नवगिरे, शिवशंकर राठोड, मनोहर दुपारगुडे, उमेश वाघमारे, राहुल भडकुंबे आदी संघटनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *