मेस्कोमार्फत अशासकीय लिपीक टंकलेखक पदासाठी भरती
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अशासकीय लिपीक टंकलेखक पदासाठी भरती करण्यात येणार आहे. लिपिक-टंकलेखकाचे अशासकीय एक पद मेस्कोमार्फत भरावयाचे आहेत. जिल्हयातील पात्र माजी सैनिकांनी सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह गुरुवार, दि. २० फेब्रुवारी २०२५ पुर्वी जिल्हा सैनिक कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार यांनी केले आहे.
जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्या रोजगार पटावर नोंद असलेल्या युध्द विधवा युध्दजन्य कारणाव्यतिरिक्त दिवंगत झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नी यांना प्राधान्य देण्यात येईल. सदर प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्या माजी सैनिकांच्या विधवा पत्नी या पदासाठी पात्र ठरतील. प्राप्त अर्जामधील उमेदवारांची गुरुवार, दि. २0 फेब्रुवारी २०२५ रोजी मुलाखती घेण्यात येतील.
सदर पदासाठी मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास किमान ३० शब्द असल्याचे वाणिज्य प्रमाणपत्र, महाराष्ट्र शासनाचे एमएससीआयटी प्रमाणपत्र धारण केलेले किंवा मराठी टंकलेखन येणे अनिवार्य राहील. जिल्ह्यातील माजी सैनिक, युध्द विधवा, माजी सैनिकांच्या पत्नी यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार यांनी केले आहे.