जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाचे पुरस्कार ; २६  जानेवारीला जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर  : सोलापुरातील क्रीडा क्षेत्रातील अतिशय महत्वाचा सहा पुरस्कार दि. २६ जानेवारी रोजी देण्यात येणार आहे. हा पुरस्कार श्रेया मुकूंद परदेशी, श्रीगणेश प्रशांत उडता यांच्यासह वैभवराज बापू रणदिवे या दिव्यांग खेळाडूला गुणवंत खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी दिली आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या मार्फत दरवर्षी जिल्ह्यातील क्रिडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दि. २६ जानेवारी रोजी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहनाच्या कार्यक्रमामध्ये पुरस्कार  देण्यात येत असतो. या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व  १० हजार रुपये रोख बक्षीस असे आहे.

सन २०२३-२४ मध्ये क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू पुढील प्रमाणे  :

                                                                                           श्रेया परदेशी

गुणवंत खेळाडू पुरस्कार २०२३-२४:

(मुली) :श्रेया मुकूंद परदेशी (शिक्षण बी.ए.) : श्रेया मुकूंद परदेशी हिने धर्नुविद्या या खेळात  सन २०१८ ते २०२२ मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले आहे.  राज्यस्तरीय शालेय  क्रीडा स्पर्धेत २०१८ ते २०२३ महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करून अनेक पदके प्राप्त केली आहेत.  तिच्या या क्रीडा क्षेत्रातील खेळाडू म्हणून कार्याचे मुल्यमापन करून  सन २०२३-२४ या सालासाठी  गुणवंत खेळाडू जिल्हा क्रीडाडा पुरस्कार (मुली) देण्यात येत आहे.

                                                                       श्रीगणेश उडता

(मुले) : श्रीगणेश प्रशांत उडता (शिक्षण १२ वी) : श्रीगणेश प्रशांत उडता याने २०२३ साली राज्यस्तरीय शालेय डायव्हिंग क्रीडा स्पर्धेत १  मीटर,३ मीटर व हायबोर्ड डायव्हिंग या खेळ प्रकारात  उत्कृष्ट कामगिरी केली आहे.   सन २०२४ राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर  सहभागी झालेला आहे. त्याच्या या क्रीडाक्षेत्रातील खेळाडू म्हणून कार्याचा मुल्यमापन करून त्याला सन २०२३-२४ सालातील गुणवंत खेळाडू जिल्हा क्रीडा पुरस्कार (मुले) देण्यात येत आहे.

                                                                                    वैभवराज रणदिवे

गुणवंत खेळाडू पुरस्कार २०२३-२४, (दिव्यांग खेळाडू)  : वैभवराज बापू रणदिवे (शिक्षण १२ वी).  वैभवराज बापू रणदिवे या खेळाडूने १० मीटर एअर पिस्टल शूटिंग (नेमबाजी), दुसऱ्या झोनल पॅराशुटींग चॅम्पियनशिपमध्ये जुनियर गटात सुवर्णपदक प्राप्त केले आहे.  तिसऱ्या नॅशनल पॅराशुटींग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ज्यूनियर गटामध्ये कांस्यपदक, इंटरनॅशनल शूटींग चॅम्पियनशिप ऑफ होनोहर (जर्मनी) या स्पर्धेत सीनियर गटात सहभाग,  पहिल्या प्यारा खेलो इंडिया शूटींग स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले आहे. त्याच्या या क्रीडा क्षेत्रातील खेळाडू म्हाणून कार्याचा मुल्यमापन करून त्यांच्या सन २०२३-२४ सालातील गुणवंत दिव्यांग खेळाडू जिल्हा क्रिडा पुरस्कार देण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact