निवासी उपजिल्हाधिकारी  मनिषा कुंभार : जिल्हा प्रशासनातर्फे सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त नियोजन भवनात  कार्यशाळा 

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर :  प्रत्येक वर्षी संपूर्ण जगभरात फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो. त्या अनुषंगाने माहिती सुरक्षा शिक्षण आणि जागरूकता याबाबत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण स्तरापर्यंत इंटरनेट सुरक्षेच्या अनुषंगाने नागरिकांचे प्रबोधन करण्यात येते. आज सर्वत्र इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे तसेच त्यातून आपली फसवणूक होण्याची शक्यता ही असते तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी इंटरनेटच्या माध्यमातून आपली फसवणूक होऊ नये, यासाठी अत्यंत जागृत असले पाहिजे. इंटरनेटचा सुरक्षित पद्धतीने वापर करून एक सजग इंटरनेट वापरकर्ता नागरिक बनले पाहिजे, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी केले.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पेपर इंटरनेट कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी उप जिल्हाधिकारी कुंभार मार्गदर्शन करत होत्या. यावेळी उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, निवडणूक उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी व्ही. रवी, तहसीलदार समीर यादव यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख, त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार म्हणाल्या, जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, त्यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचारी यांनी शासकीय कामकाजासाठी इंटरनेटचा वापर करत असताना इंटरनेट सुरक्षेच्या दृष्टीने जागरूक राहावे. आपल्या कार्यालयातील माहिती गोपनीय राहील. शासकीय संकेतस्थळ मेल आयडी हॅक होणार नाही, या दृष्टीने इंटरनेट सुरक्षा बाबत दक्ष रहावे. त्यासाठी आजच्या सेफर इंटरनेटचे कार्यशाळेच्या माध्यमातून मिळणारे प्रशिक्षणाचा वापर प्रत्यक्ष काम करताना करावा. सर्व शासकीय माहिती व्यवस्थित राहील यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी आवाहन केले. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी इंटरनेटचा विविध कामासाठी विशेषता आर्थिक कामासाठी वापर करत असताना अत्यंत सजग रहावे, असेही आवाहनही त्यांनी केले.

एनआयसीचे जिल्हा सूचना अधिकारी व्ही. रवी यांनी जगभरात प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सेफर इंटरनेट डे साजरा करण्यात येत असतो. या पार्श्वभूमीवर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहितीत तंत्रज्ञान मंत्रालयाच्यावतीने सर्व जिल्ह्यात जिल्हास्तरावर सुरक्षित इंटरनेट दिवस कार्यशाळेचे आयोजन करून या माध्यमातून जिल्हास्तरीय शासकीय यंत्रणांना इंटरनेट सुरक्षेच्या दृष्टीने प्रशिक्षण देण्यात येत असते व या माध्यमातून जास्तीत जास्त इंटरनेट सुरक्षितता कशा पद्धतीने राखता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात येत असते, असे त्यांनी सांगितले.   यावेळी रवी यांनी सुरक्षित इंटरनेट दिन कार्यशाळेच्या अनुषंगाने प्रत्येकाने कशा पद्धतीने खबरदारी घ्यावी, याचे उदाहरणासह मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन निराकरण केले.

सुरक्षित इंटरनेट दिवस (safer internet day) कार्यशाळा (आयएसईए) प्रकल्प :

staysafeonline.in  व्हॉटसॲप  नंबर : (९४९०७७१८००), टेलिग्राम चॅनल ; (आयएसईए) : (डिजीटल नागरिक) Digital Naagrik, GMAIL – isea@cdac.in यावर आपल्या तक्रारी सूचना नोंदवून माहिती घ्यावी.

*माहिती सुरक्षा शिक्षण आणि जागरुकता (ISEA) प्रकल्प-  सुरक्षित इंटरनेट दिवस दरवर्षी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात साजरा केला जातो, जागरुकता वाढवणे, इंटरनेटच्या सुरक्षित आणि जबाबदार वापराला प्रोत्साहन देणे, विशेषत: मुले, महिला आणि तरुणांमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (Meity) NIC च्या सहकार्याने ISEA प्रकल्पाच्या अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सादरीकरणाची रुपरेषा : 

इंटरनेट बद्दल, आपल्या दैनंदिन जीवनात इंटरनेटचा वापर, इंटरनेटचा सुरक्षित वापर (इंटरनेट सुरक्षा), सामान्य सायबर धोके, सायबर स्वच्छता पध्दती, सायबर गुन्ह्यांची तक्रार करण्याची यंत्रणा (1930), ऑनलाइन सुरक्षित राहण्यासाठी जागरुकता संसाधने

इंटरनेट म्हणजे काय ?

  • इंटरनेट हे मुळात नेटवर्क्सचे एक नेटवर्क आहे जे जगभरातील अब्जावधी उपकरणांना जोडते.
  • ही एक प्रकारची लायब्ररी आहे, जिथे तुम्हाला हवे असलेले जवळजवळ काहीही मिळेल.
  • इंटरनेट वापरल्या जाणाऱ्या जागा :
  • घर, शाळा, कार्यालय, मॉल्स, ड्रायव्हिंग, बँका
  • आपल्या दैनंदिन जीवनात इंटरनेटचा वापर :
  • सोशल नेटवर्कींग : E-commerce, Payments, Communications, Travel, Browsing, Shopping, Job search

इंटरनेट वापराचे टोटे :

व्हायरसचा धोका, संवेदनशील माहिती, पैशांची फसवणूक, स्पॅम, इंटरनेट व्यसन, वैयक्तिक माहितीची चोरी, नेहमी कामावर, लठ्ठपणा आणि आरोग्य समस्या, सामाजिक दुरावस्था, ट्रोल, धमकावणे आणि पाठलाग, असामान्य खर्च, सायबर गुन्हे, वेळेचा अपव्यय, दिशाभूल करणारी माहिती, लक्ष केंद्रित न करणे.

सुरक्षिता :   या कार्यशाळेत जिल्हा सूचना अधिकारी रवी यांनी इंटरनेटचा वापर करत असताना कशा पद्धतीने सुरक्षितता राबवावी, यादृष्टीने सविस्तर मार्गदर्शन केले. इंटरनेट वापरत असताना आर्थिक दृष्ट्या तसेच आपले गोपनीय दस्तावेज याच चोरी इंटरनेटच्या माध्यमातून होऊ नये, यासाठी प्रत्येक नागरिकांनी सुरक्षितता कशा पद्धतीने ठेवावी. कोणत्याही इंटरनेट वरील घोटाळ्यात आपले नुकसान होऊ नये, यासाठी कशा पद्धतीने आपले आयडी पासवर्ड सुरक्षित ठेवावेत, या दृष्टीने सविस्तर मार्गदर्शन करून सर्व नागरिकांनी सुरक्षित इंटरनेट दिवस कार्यशाळेतील प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष इंटरनेटचा वापर करत असताना सुरक्षा बाळगावी असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact