पद्मशाली सखी संघमचा उपक्रम: शनिवार, दि. २६ जुलै रोजी आयोजन
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : महिलांसाठी ‘इमिटेशन ज्वेलरी (फॅशन) प्रशिक्षणाचे शनिवार, दि. २६ जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी व पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा मेघा इट्टम, सल्लागार ममता मुदगुंडी यांनी दिली आहे.
पद्मशाली सखी संघम, कल्पना दिव्यांग महिला उद्यमिता समूह (पुणे) आणि पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित केले आहे. कन्ना चौकातील पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या ‘विणकर सभागृहात’ शनिवारी दोन सत्रात हे प्रशिक्षण होईल. पुण्याच्या अर्चना कापरे आणि त्याच्या सहकारी सदरचे प्रशिक्षण देतील.
अधिक माहितीसाठी सल्लागार ममता मुदगुंडी (९१७५८८९४०) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांनी केले आहे.