विभागीय हातमाग स्पर्धेसाठी अर्ज करा;  प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग उज्वला पळसकर यांचे आवाहन

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर  :  राज्यातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी  व विणकारांनी उत्पादित केलेल्या उत्कृष्ट वाणाला सम्मान मिळावा, या दृष्टीकोनातून विभागीय हातमाग कापड स्पर्धा  आयोजित करण्यात आली आहे.

प्रादेशिक उपआयुक्त, वस्रोद्योग, सोलापूर यांच्या अधिपत्याखाली सोलापूर जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, सातारा व पुणे या जिल्ह्यातील प्राथमिक हातमाग विणकर सहकारी संस्था / स्वयंसहाय्यता गट व खाजगी क्षेत्रातील हातमाग विणकरासाठी हातमाग कापड स्पर्धा दि. ४ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता  सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघ, अक्कलकोट रोड एम.आय.डी.सी. सोलापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

सदर कापड स्पर्धेसाठी हातमाग विणकरांनी हातमागावर विणलेल्या पारंपारिक व अपारंपारिक डिझाईनच्या अतिउत्कृष्ट नाविण्यपुर्ण व कलात्मक वाणाची प्रदर्शीत वाणामधून निवड करुन उत्कृष्ट वाणास प्रोत्साहनपर बक्षिस देवून हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. विभागीय हातमाग कापड स्पर्धा स्पर्धेसाठी पारंपारिक (साड्या, लुगडी, लुंगी, खणावळी, धोतरे आदी) व अपारंपारीक (टॉवेल, चादरी, शर्टीग, कोटींग पडद्याचे कापड, मफलर, शॉल, वॉल हॅगींग इत्यादी) वाणाचे हातमाग विणकरांनी त्यांनी हातमागावर उत्पादन केलेले कलात्मक व नाविण्यपुर्ण वाण दि. ३ मार्च २०२५ पर्यंत प्रादेशिक उपआयुक्त, वस्रोद्योग, सोलापूर, सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी पत संस्था इमारत, जुने जिल्हाधिकारी आवार, सोलापूर येथे स्विकारण्यात येतील.

आयोजित केलेल्या स्पर्धेत विभागीय हातमाग कापड निवड समितीमार्फत उत्कृष्ट वाणाची निवड करण्यात येणार आहे.  विभागीय हातमाग कापड स्पर्धेत सहभाग  घेवून प्रदर्शीत केलेल्या वाणामधून प्रथम पारितोषीक रु. २५ हजार,  द्वितीय २० हजार व तृतिय बक्षिस १५ हजार रुपये याप्रमाणे पारितोषीक जाहीर करुन हातमाग विणकरांना समारंभा वेळी प्रशस्तिपत्रकासह देण्यात येणार आहे.

तरी सदर विभागीय हातमाग स्पर्धेकरीता हातमाग सहकारी संस्था, स्वयंसहाय्यता गट व खाजगी क्षेत्रातील हातमाग विणकरांनी मोठ्या संख्येने सहभागी असे आवाहन  प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग उज्वला पळसकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact