दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान :  सांगोला येथील शिबिरात दोन दिवसात १,६६९ लाभार्थ्यांची तपासणी; माळशिरसमध्ये तीन दिवसात २,७२९ लाभार्थ्यांची तपासणी

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : जिल्ह्यात दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र शिबिराचा ११ वा दिवस संपला असून, आजपर्यंत पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी, अकलूज, माळशिरस व  सांगोला तालुक्यातील ९ हजार २५७ लाभार्थ्यांनी शिबिरात तपासणी करून घेतलेली आहे. दिव्यांग व्यक्तीकडून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. माळशिरस अकलूज येथे दि. २९, ३० ऑगस्ट २०२४ रोजी दोन दिवसाचे शिबिर होणार होते, परंतु लाभार्थ्याच्या प्रचंड प्रतिसादामुळे दि. ३१ ऑगस्ट २०२४ या अतिरिक्त दिवशी शिबीर घेण्यात आले. तर दि.५ व ६ सप्टेंबर २०२४ रोजी करमाळा येथे शिबीर होणार असल्याने या शिबिरात जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी सहभागी व्हावे. आपली तपासणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

जे लाभार्थी अपंगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्र ठरले आहेत, त्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र घेण्यासाठी परत शासकीय कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. त्यांचे अपंगत्व प्रमाणपत्र त्यांनी नमूद केलेल्या पत्त्यावर टपालाद्वारे पाठवण्याची प्रशासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात येत आहे. शिबिराच्या ठिकाणी शासनाच्या अन्य योजना चा लाभ दिव्यांगाना देण्यासाठी संबंधित विभागाचे माहिती स्टॉल लावण्यात आलेले आहेत. अन्य शासकीय योजनातून दिव्यांगांना लाभ देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

या अभियान अंतर्गत तपासणी व निदान विशेष मोहीम दि. १९ ऑगस्ट २०२४ पासून सुरू झालेले आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यांपैकी पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी, माळशिरस व सांगोला या पाच तालुक्यातील शिबिरे अत्यंत यशस्वीपणे झालेली आहेत. माळशिरस येथे नियोजित दोन दिवसापेक्षा अधिकचा एक दिवस शिबिरासाठी देण्यात आला. या ठिकाणी अकलूज माळशिरस भागातील लाभार्थ्याकडून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. हे सर्व शिबिरे यशस्वी होण्यासाठी आरोग्य यंत्रणा अत्यंत सक्षमपणे कार्य करत आहे, अशी माहिती मित्राचे संचालक अभिजीत राऊत यांनी दिली.

================================================================================

अन्य शासकीय योजनांची माहिती 

शिबिराच्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या अन्य सर्व शासकीय योजनांची माहिती प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला सर्व संबंधित विभागाने त्यांची यंत्रणा त्या ठिकाणी ठेवून अत्यंत व्यवस्थितपणे समजावून सांगावी तसेच दिव्यांग व्यक्ती योजनांसाठी पात्र ठरत असतील तर त्यांना त्या योजनांचा लाभ मिळण्याबाबतचे अर्ज जागेवरच भरून घ्यावेत. एक ही पात्र दिव्यांग लाभार्थी शासकीय योजना पासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व शासकीय यंत्रणेने दक्षता घ्यावी, असेही त्यांनी निर्देशित केले. दिव्यांगांना शासकीय योजनेचा लाभ देऊन त्यांच्यात कौशल्य निर्माण करून त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

======================================================

२२ शिबिरातून १५,६६६ दिव्यांग लाभार्थ्याची तपासणी होणार

 जिल्ह्याच्या अकरा तालुक्यात प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण २२ शिबिराचे आयोजन करण्यात येत असून यासाठी १५ हजार ६६ दिव्यांग लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. जिल्ह्यातील दिव्यांगांची संख्या १ लाख १५ हजार ७५५ इतकी असून, यातील ६८ टक्के  ग्रामीण भागातील तर शहरी भागातील ३२ टक्के दिव्यांग संख्या आहे. आशाताई आणि यंत्रणेतील तालुका स्तरावरील संबंधित घटकांसाठी २७ कार्यशाळा घेण्यात आले असून, त्यातून ३७४२ प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती मित्राचे संचालक अभिजीत राऊत यांनी दिली.

============================================================================

 दिव्यांग शिबिरात आरोग्य यंत्रणेची भूमिका महत्त्वाची

 या अभियानात आरोग्य यंत्रणा, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, समाज कल्याणचे अधिकारी, स्वयंसेवी संस्था व मिशन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड ॲक्शन(मित्रा) यंत्रणेवर जबाबदारी असून, हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्परात समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या. त्याप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत येणारे सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अंतर्गत येणारे सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे या शिबिरासाठी विशेष मेहनत घेत आहेत. असेच काम करून दिव्यांग व्यक्तींची योग्य तपासणी करून त्यांना वैश्विक प्रमाणपत्र वेळेत मिळण्यासाठी सर्वांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी असेही त्यांनी सूचित केले.

=============================================================================

शिबिराचे वेळापत्रक 

जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र देण्याकरीता दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी आणि निदान विशेष मोहिम कार्यक्रम शिबीर वेळापत्रक तालुका, लाभार्थी संख्या, शिबीर स्थळ, दिनांक, वार व वेळ निहाय पुढीलप्रमाणे-

  • करमाळा – १६२९, ग्रामीण रुग्णालय, करमाळा, दि. ५ व ६ सप्टेंबर २०२४, गुरुवार व शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता. 
  • मोहोळ – १८४१, ग्रामीण रुग्णालय, मोहोळ, दि. ९, १० व १२ सप्टेंबर २०२४, सोमवार, मंगळवार  व गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता. 
  • माढा – १२९२, ग्रामीण रुग्णालय, कुर्डूवाडी, दि. १३ व १४ सप्टेंबर २०२४, शुक्रवार व शनिवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता. 
  • मंगळवेढा – ८०८, ग्रामीण रुग्णालय, मंगळवेढा, दि. १७ व १९ सप्टेंबर २०२४, मंगळवार व गुरुवार सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता. 
  • सोलापूर दक्षिण – १२९४, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सोलापूर, दि.
  • २०  व २१ सप्टेंबर २०२४, शुक्रवार व शनिवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता. 
  • सोलापूर उत्तर – ५६१, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सोलापूर, दि. २३ सप्टेंबर २०२४, सोमवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता.

================================================================================

सांगोला तालुक्यात झालेले शिबीर

सांगोला- ग्रामीण रुग्णालय, सांगोला, दि. २ व ३ सप्टेंबर २०२४, सोमवार व मंगळवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता दिव्यांग तपासणी शिबीर झाले.  सांगोला तालुक्यात एकूण १६६९ दिव्यांग लाभार्थीची तपासणी करण्यात आली. यामध्ये दृष्टीहीन १७४, बौद्धिक अपंगत्व ३०९, श्रवणदोष ३२६, लोकोमोटर अपंगत्व ५१९, बालरोग १०८ व औषधे २३३ असे एकूण १६६९ रुग्णांची तपासणी करण्यात आली.  माळशिरस ग्रामीण रुग्णालय येथे दि. २९ व ३० ऑगस्ट रोजी तसेच दि. ३१ ऑगस्ट चा अतिरिक्त दिवस या कालावधीत सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र शिबिरासाठी २७२९ लाभार्थ्यांनी तपासी तपासणी करून घेतली. अकलूज माळशिरस या भागात शिबिराला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. असाच प्रतिसाद उर्वरित तालुक्यातील शिबिराला मिळावा, असे आवाहन आवाहन अभिजीत राऊत यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact