मकबूल मोहोळकर : संदल मिरवणूक, चिरागा, महाप्रसाद
आदी धार्मिक, सांस्कृतिक, विधायक उपक्रम
by assal solapuri ||
सोलापूर : बाराईमाम चौकातील जागृत सुफी संत हजरत पीर हाजी अहमद अली शाहबाबा यांच्या १२२ व्या उरूस उत्सवानिमित्त दि. ५ ते ७ सप्टेंबर २0२४ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आली आहे, अशी माहिती बाराईमाम चौक युवक संघटना, हजरत पीर हाजी हाफीज अहमदअली शाह चिश्ती निजामी (रह.) कुदस्सर अजिजु दर्गाह कमिटीचे संस्थापक अध्यक्ष हाजी मकबूल मोहोळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यानिमित्त संदल मिरवणूक, चिरागा, महाप्रसाद आदी धार्मिक, सांस्कृतिक व विधायक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
===============================================================================
- जश्ने ईद-ए-मिल्लादुन्नबी पैगंबर जयंतीनिमित्त दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत जश्ने-ईद-मिलादुन्नबी जुलूस कमिटीच्या मुख्य मिरवणुकीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद, दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत बाराईमाम चौक, सोलापूर येथे इंटरनॅशनल कव्वाल अजीम नाजा (टी.व्ही.स्टार) यांच्या कव्वालीचा शानदार कार्यक्रम होणार आहे.
- ———————————————————————————————————————————
- सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही सोलापूर शहर बाराईमाम चौकातील जागृत सुफी संत (कुलदैवत) हजरत पीर हाजी हाफीज अहमद अली शाह चिश्ती निजामी (रह.) यांच्या १२२ व्या उरूसनिमित्त (उत्सव) दि. ५ ते ७ सप्टेंबर २०२४ पर्यंत तसेच जश्ने ईद-ए-मिल्लादुन्नबी पैगंबर जयंतीनिमित्त दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी महाप्रसाद, दि. १६ सप्टेबर २०२४ रोजी बाराईमाम चौकात कव्वालीचा शानदार कार्यक्रम होणार आहे. तसेच मोठया प्रमाणात धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व विधायक अशा विविध उपक्रमही पार पडणार आहेत.
- ——————————————————————————————————————————–
- गुरुवार, दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत भव्य शानदार संदल मिरवणूक, ढोलीबाजा, बँजो, बँडबाजा उंट, घोडे, बग्या आदींचे उत्कृष्ट सजावटीसह देखावा, लाठी आखाडा, टिपरी मिलाद निघणार आहे. रात्री १० ते १२ यावेळेत बिगर स्पीकर वाद्याने सदरची मिरवणूक बाराईमाम चौक ते समाचार चौक, माणिक चौक, विजापूर वेस, बेगमपेठ पोलीस चौकी, किडवाई चौक, सोशल हायस्कूल, मौलाना आझाद चौक, मुस्लिम पाच्छा पेठ, जिंदशाह मदार चौक, पद्मशाली चौक, अकबर वाद्याने कासीम मस्जीद समोरुन, जोडबसवण्णा चौक, रंगा चौक, भारतीय चौक, इक्बाल क्लब, पेंटर चौक, विजापूर वेस, बाराईमाम चौक दर्गाह पटांगण येथे विसर्जन होणार आहे.
- ——————————————————————————————————————————-
- शुक्रवार, दि. ६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते १० यावेळेत चिरागनिमित्त बाराईमाम चौक येथे महाप्रसाद (जर्दा वाटप) कार्यक्रम होईल.
- ——————————————————————————————————————————
- शनिवार, दि. ७ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता जियारत-नियाजे अहमदअलीशाह बाबा महाप्रसाद (दालचा खाना) वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
- ——————————————————————————————————————————
- बाराईमाम चौक पैगंबर जयंती उत्सव कमिटीच्यावतीने जश्ने-ईद-मिलादुन्नबी (स्व.) पैगंबर जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
- ———————————————————————————————————————————
- सोमवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी २ यावेळेत बाराईमाम चौक युवक संघटनेच्यावतीने जश्ने-ईद-मिलादुन्नबी (स्व.) पैगंबर जयंतीनिमित्त सामुदायिक जुलस मिरवणुकीमध्ये मिठाई (गोड प्रसाद) वाटप व दुपारी २ वाजता महाप्रसाद (तबरुक) वाटप करण्यात येईल.
- —————————————————————————————————————————–
- सोमवार, दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ ते १२ यावेळेत बाराईमाम युवक संघटनेच्यावतीने बाराईमाम चौक, सोलापूर येथे इंटरनॅशनल कव्वाल अजीम नाजा (टी.व्ही.स्टार) यांचा कव्वालीचा शानदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
- —————————————————————————————–
तरी वरील सर्व कार्यक्रमास सोलापूर शहर व जिल्हयातील तमाम हिंदू- मुस्लिम बांधवानी धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व विधायक कार्यक्रमास उपस्थित राहुन लाभ घ्यावा, सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी (स्व) जुलूस कमिटी संस्थापक अध्यक्ष, ट्रस्टी अध्यक्ष व मोहरम कमिटी शहर अध्यक्ष हाजी मकबूल मोहोळकर, बाराईमाम चौक पैगंबर जयंती कमिटी अध्यक्ष ताजोद्दीनभाई मोहोळकर, उरूस कमिटी अध्यक्ष आवेज (गब्बर) मोहोळकर, कार्याध्यक्ष मोहम्मद नवाज मोहोळकर यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस बाराईमाम चौक युवक संघटना सरचिटणीस असीमभाई तुळजापुरे, पानगल मस्जिद शनिवार पेठ जमात ट्रस्टी अ. कदीर अलीम, उरूस कमिटी सोलापूर शहर संघटक शाह इक्बाल दुर्वेश, कायदेशीर सल्लागार अँड. इस्माईल नालवार आदी उपस्थित होते.