गौरा इन्फेक्शन क्लबतर्फे सोलापूरमध्ये टॅलेंट ग्रुमिंग प्रोग्रॅम
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : पुणे येथील गौरी नाईक आणि जयंत पाटील यांच्या गौरा इव्हेंट अँड एंटरटेनमेंटतर्फे सोलापूरमध्ये सहा दिवसीय टॅलेंट ग्रुमिंग प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गौरा इन्फेक्शन क्लबच्या संस्थापिका गौरी नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पाच दिवसीय टॅलेंट ग्रुपिंग प्रोग्रॅम, वर्कशॉपनंतर सहाव्या दिवशी ग्रैंड फिनालेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सोलापुरातील मुले,मुली व विवाहित महिलांसाठी तीन गट तयार करण्यात आले आहे. त्यांना रॅम्पवर चालणे, विविध पोज देणे, मॉडेलिंग कशी करावी, स्वतःला एक्सप्रेस कसे करावे, कॉन्फिडन्स कसा वाढवावा, याचे पाच दिवस सुरेख असे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गौरी नाईक या स्वतः २०२१ च्या टिस्का मिस- मिसेस इंडियाच्या सुवर्णपदकाच्या मानकरी आहेत. गौरा इव्हेंट अँड एंटरटेनमेंट या कंपनीतर्फे यापुर्वीही पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली येथेही अशा प्रकारच्या कार्य्कामांचे आयोजन करण्यात आहे होते.
गौरी नाईक म्हणाल्या, सोलापुरात खूप छान टॅलेंट आहे. त्याला योग्य पातळीवर नेण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. कंपनीतर्फे ग्रीन थीम अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रमध्ये दहा लाख झाडे लावण्याचे नियोजन आहे. सोलापूरमध्येदेखील मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यासाठी योजना हाती घेण्यात येणार आहे.