वर्गणीसाठी धर्मादाय कार्यालयाची परवानगी आवश्यक

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर  :  महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम१९५० अंतर्गत कलम ४१-क नुसार कोणतीही नोंदणी नसलेली व्यक्ती अथवा संस्था धार्मिक किंवा धर्मादाय हेतूसाठी वर्गणीदेणगी अथवा मालमत्ता गोळा करीत असल्यासत्यांनी त्या वसुलीबाबत तत्काळ धर्मादाय आयुक्तांना कळविणे व परवानगी घेणे बंधनकारक आहे, असे सोलापूर विभागाचे धर्मादाय उप आयुक्त ईश्वर सुर्यवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळवले आहे.

          गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या परवानगीशिवाय वर्गणी गोळा केल्यास मंडळातील सदस्य कायदेशीर कार्यवाहीस पात्र आहेत. सदर कायदा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास द्रव्यदंड व तुरुंगवासाची शिक्षा तरतूद आहे.

           सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांनी वर्गणी किंवा देणगी गोळा करताना धर्मादाय आयुक्त कार्यालयाची पुर्वपरवानगी घेणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्यासाठी त्यांनी धर्मादाय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करुन परवानगी घ्यावी. अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ असूनhttp://chariy.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर त्याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • मंडळातील सदस्यांचे अधिकृत ओळखपत्र (आधार/पॅनकार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदान ओळखपत्र)

  • जागेचा संमतीपत्र किंवा स्थानिक स्वराज संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र

  • मंडळ स्थापनेचा ठराव

  • मागील वर्षाचा खर्चाचा हिशोब

  • पाच हजार रुपयांपेक्षा जास्त जमा खर्च असल्यास लेखापरिक्षक अथवा सनदी लेखापालाचा अहवाल आवश्यक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *