जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रेशमा गायकवाड  : सोलापूरच्या गड्डा यात्रेत हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन पालकांपर्यंत सुखरूप पोहोचविण्यासाठी तत्पर सेवा

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर  : प्रतिवर्षाप्रमाणे श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर महाराजांची गड्डा यात्रा भरली आहे. यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असून, यात्रेत हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन अथवा सापडलेले बालक पोलिसांच्या मदतीने  त्यांच्या पालकांपर्यंत सुखरूप पोहोचविण्याकरिता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय व जिल्हा बालसंरक्षण कक्षअंतर्गत चाईल्ड लाईन १०९८ ची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, असे  माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रेशमा गायकवाड यांनी कळविले आहे.

ज्या बालकांना  काळजी व संरक्षणाची गरज आहे. अशा बालकांना सेवा देण्यात येत आहे. यात रस्त्यावरील बालके, बालकामगार शोषित बालके, देह विक्रिस बळी पडलेली,  व्यसनाधिन, संषर्घग्रस्त,  मतिमंद, (एच.आय.व्ही.) एड्सग्रस्त, आपत्तीग्रस्त,  कौटुंबिक कलहास बळी पडलेले बालके, वैद्यकीय मदतीसाठी, निवाऱ्याच्या शोधात असलेले,  हरवलेले बालके परत पाठविण्यासाठी, शोषणापासून संरक्षण, भावनिक मदत व मार्गदर्शन माहिती व संदर्भ सेवेकरिता कार्यरत आहे. जर अशी कोणती बालके निदर्शनास आल्यास तत्काळ होम मैदान पोलीस चौकीशी संपर्क साधवा अथवा चाईल्ड हेल्पलाईनच्या टोल फ्री नंबर १०९८ वर कळवावे, असे आवाहनही जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रेशमा गायकवाड यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *