फुरडे ग्रुपच्या पुढील पिढीची आयटी क्षेत्रात एंट्री;

आता जन्मभूमीच कर्मभूमी बनविण्याची युवकांचे स्वप्न साकारणार

  • ५० बेरोजगार युवकांना मिळणार नोकरीची संधी

  • भविष्यात ५०० हून अधिक युवकांसाठी सोलापूर आयटी हब निर्माण करणार

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : बांधकाम क्षेत्रात गेली तीन दशकाहून अधिक काळ नावाजलेले आणि एक ब्रंड म्हणून आपली एक वेगळी ठसा उमटवलेल्या फुरडे ग्रुपने बुधवारी आयटी क्षेत्रात पाऊल टाकण्याचे ठरविले आहे. सुनील फुरडे यांचे सुपुत्र रोहन यांनी दमाणीनगर येथील स्वतःच्या जागेत फुरडे इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही आयटी कंपनी सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. अशी माहिती फुरडे ग्रुपचे सुनील फुरडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

=============================================================================

५००-६०० बेरोजगार युवकांना नोकरीची संधी
फुरडे ग्रुपच्या माध्यमातून सोलापुरातील बेरोजगार युवकांना नोकरीची संधी मिळणार आहे. सुरुवातीला ५०-६० युवकांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भविष्यात सोलापुरात फुरडे ग्रुपच्या माध्यमातून आयटी हब निर्माण करण्यात येणार असून, ५००-६०० बेरोजगार युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे सुनील फुरडे यांनी सांगितले.

============================================================================

या नवीन कंपनीच्या निमित्ताने सोलापुरातील युवकांना जन्मभूमीतच कर्मभूमी निवडण्याची संधी मिळत असल्याने आता युवकांचे स्वप्न साकारण्याची संधी उपलब्ध होणार आहे. असे  रोहन फुरडे यांनी सांगितले. सोलापुरात विमानतळ होत असतानाच ही नवीन आयटी कंपनी सुरू होणे म्हणजे सोलापूरकरांनी आमच्या ग्रुपवर वेळोवेळी दाखवलेल्या विश्‍वासानंतर अल्प प्रमाणात उत्तराई होण्याचा हा आमचा प्रयत्न असल्याचे फुरडे यांनी स्पष्ट केले.

बुधवारी सकाळी दहा वाजता दमाणीनगर येथे जागेत फुरडे इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा शुभारंभ शुभारंभ होत आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार दिलीप माने, लक्ष्मी हायड्रॉलिक्सचे मॅनेजिंग डायरेक्टर शरद ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

सन १९८९ मध्ये बांधकाम क्षेत्रात उतरलेल्या फुरडे ग्रुपने १९९७ मध्ये अमर कन्स्ट्रक्शनची स्थापना केली. सन २००३ मध्ये नाविन्यपूर्ण डिझाईन्स आणि प्रत्येक प्रोजेक्ट गुणवत्तेच्या सर्व पातळ्यांवर शंभर टक्के खरा उतरण्यासाठी फुरडे कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही फर्म स्थापन केली. सन २०१२ मध्ये वेअर हाऊसेस, विविध सेवा देणारा ग्रुप रिअल इस्टेट व कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीज म्हणून एक जाणकार खेळाडू म्हणून उदयास आला.सन २०१८ मध्ये रोहित फुरडे यांनी रोहित रिअलिटी ही फर्म सुरू केली सोलापूर, पुणे येथे प्लॉट्स विक्री, बांधकाम क्षेत्र आणि फॅसिलिटी मॅनेजमेंट क्षेत्रात कार्य सुरू करण्यात आले.

=============================================================================

पुण्याचा सिंहगड रस्ता जलमय आणि सोलापुरातील हवालदिल पालक अशा बातम्या गेल्याच महिन्यात  विविध वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आल्या. महिन्याभरात पडणारा पाऊस साडेतीन तासात कोसळल्यानंतर असंख्य चिंतित सोलापूरकरांनी त्यावेळी आपापल्या मुलांना व्हिडिओ कॉल लावल्याचेही नंतर स्पष्ट झाले. हीच अनिश्‍चितता दूर करण्यासाठी सोलापुरात आयटी कंपनीचा शुभारंभ करण्याचे फुरडे ग्रुपने फुरडे इन्फोटेकच्या माध्यमातून ठरविले आहे. सोलापुरात रेल्वे पाठोपाठ विमानतळाची कनेक्टिव्हिटी होत असताना फुरडे इन्फोटेक यांच्याप्रमाणेच आणखीही आयटी इंडस्ट्रीज वाढण्याची नितांत गरज असल्याचे सुनील फुरडे यांनी शेवटी सांगितले.

=======================================================================

रोहन, सुनिल फुरडे हे बुधवारी आपल्या सहकारी टीमसोबत फुरडे इन्फोटेकचा शुभारंभ करीत आहेत. आयटी इंडस्ट्रीमधील ही एक सुरुवात असून, या इंडस्ट्रीजचा आणखी विस्तार करण्याचा संकल्प फुरडे ग्रुपने केला आहे. या पत्रकार परिषदेसाठी कंपनीचे संचालक रोहित सुनील फुरडे, सीईओ आनंद मार्डीकर, आसिफ बागवान, दिगंबर कोनापुरे, कर्मचारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact