३५,७८,७९२ इतकी मतदारांची संख्या; ३७२३ मतदान केंद्रे
By kanya News||
सोलापूर : प्रारूप मतदार यादी दि. ६ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. यानुसार जिल्ह्यात ३५ लाख ७८ हजार ७९२ इतकी मतदारांची संख्या आहे. तरी ज्यांनी आपल्या वयाचे १८ वर्षे पूर्ण केली आहेत, अशा तरुणांनी व ज्यांचे मतदार यादीत अद्यापपर्यंत नाव नोंदवले नाही, अशा नागरिकांनी त्वरित आपले नाव मतदार यादीत नोंदवून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
निवडणूका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडयासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण, शुध्दीकरण अत्यंत महत्वपुर्ण असते, यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम (दुसरा) राबविला आहे. दि. ६ ऑगस्ट २०२४ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुर्ररिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून हा कार्यक्रम दि. ६ ऑगस्ट २०२४ ते दि. २० ऑगस्ट २०२४ या कालावधीत राबविला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.
दि. १ जुलै २०२४ रोजी किंवा त्याआधी १८ वर्षे पुर्ण केलेल्या नागरिकांना या कालावधीत मतदार नोंदणी करता येणार आहे. २०२४ मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकामध्ये मताधिकार बजाविण्यासाठी ही महत्वाची संधी असलेने पात्र नव मतदारांनी नाव नोंदणी करावी, तसेच ज्या मतदारांची नावे वगळली गेलेली आहेत अथवा ज्यांची नावे मतदार यादीमध्ये नाहीतच अश्या सर्व नागरिकांनी नमुना अर्ज क्र. ६ भरून आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करावीत असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
प्रारूप यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची मतदारांनी खत्री करणे आवश्यक आहे. कारण, बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नांव मतदार यादीमध्ये नाही अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. तसेच आपले नाव, पत्ता, लिंग, जन्म दिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशिल सुध्दा अचुक आहे का याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना सदर तपशिलामध्ये दुरूस्त्या करावयाच्या असतील त्यांनी अर्ज क्रमांक ८ भरावा. विशेष संक्षिप्त पुर्रनिक्षण कार्यकमांतर्गत एखाद्या मतदारासंघातील एखादा मतदार, यादीत दिलेल्या पत्यावर राहात नसेल, तर अशा नावा बद्दल त्याच मतदारसंघातील एखदा मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्यावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्वाची असते.
तरी नागरिकांनी आपली नावे विशेष पुर्ररिक्षण कार्यक्रम मंगळवार, दि. ६ ऑगस्ट २०२४ ते २० ऑगस्ट २०२४ या कालावधीत नोंदवून घेण्यात यावीत. तद्नंतर सदर मतदार नोंदणी प्रक्रिया ही निरंतर सुरू राहणार आहे. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी मतदारांनी- voters.eci.gov.in आपली नावे मतदार यादमध्ये शोधणेसाठी ceo.maharashtra.gov.in संकेतस्थळाचा वापर करावा. मतदार यादीसंदर्भात काही माहिती आवश्यक असलेस अथवा काही दुरूस्ती असलेस संबंधित सहा.मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
- विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम :
-
नव मतदार नोंदणी, दुरूस्ती व वगळणी यासाठी दि. १० व ११ ऑगस्ट २०२४ व दि. १७ व १८ ऑगस्ट २०२४ या दिवशी विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम राबविला जाणार असून, या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओ मतदार यादीसह उपस्थित राहतील.
-
मतदार यादी : दि. २३ जानेवारी २०२४ च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकुण मतदार ३५ लाख ७८ हजार ९७२ इतकी होती. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४, ३६ लाख ५६ हजार ८३३ इतकी होती. मंगळवार, दि. ६ ऑगस्ट २०२४ रोजी सदर मतदार संख्या ही ३६ लाख ९२ हजार ४०९ इतकी असून यामध्ये पुरूष- १९ लाख ८ हजार १४६, महिला- १७ लाख ८३ हजार ९६६ व इतर २९७ मतदारांचा समावेश आहे. यामध्ये लोकसभेच्या तुलनेत ३५ हजार ५७६ इतक्या मतदारांची वाढ झालेली आहे.
-
मतदान केंद्र संख्या : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये एकूण ३६१७ मतदान केंद्र होती. यामध्ये मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण करून १२४ मतदान केंद्राची नव्याने वाढ होऊन मतदान केंद्राची संख्या ३७२३ झालेली आहे. एकूण ३७२३ मतदान केंद्रापैकी शहरी- ११७७ व ग्रामीण भागामध्ये -२५४६ मतदान केंद्राचा समावेश आहे.