श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठा, २१ व्या वर्धापन दिनानिमित्त
शुक्रवार, दि. २० सप्टेंबर रोजी कीर्तन सोहळा होणार
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : केगाव येथे ह.भ.प. काशिनाथ नारायण दळवे, आयोजित श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठा, २१ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार, दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत महाराष्ट्रातील थोर समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज (देशमुख) इंदुरीकर यांचा हरीकिर्तन सोहळा आयोजित केला आहे, अशी माहिती अशी माहिती ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष व ह.भ.प. काशिनाथ दळवे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमास छत्रपती शिवाजी महाराजांचे सोळावे वंशज शिवाजीराजे जाधव हे उपस्थित राहणार आहेत. समाजामध्ये मुलां-मुलींवर योग्य संस्कार व्हावेत, मुले व्यसनाच्या नादी न लागता त्यांच्यामध्ये वारकरी संप्रदायाची आवड निर्माण व्हावी. त्यांना गोडी लागावी, या उद्देशाने किर्तन व प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातील वारकरी मंडळी, भाविक आणि युवा वर्ग मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या पत्रकार परिषदेस ह.भ.प. नागनाथ महाराज पाटील, ह.भ.प. ज्योतिराम महाराज चांगभले, ह.भ.प. संजय महाराज पवार, ह.भ.प. पोपट महाराज चंदनशिवे, ह.भ.प. दत्तात्रय महाराज दोरकर, ह.भ.प.सुभाष महाराज दोरकर, सोमनाथ राऊत आदी उपस्थित होते.