एनजीसीए आयोजित दोन दिवसीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : डोणगाव रोडवरील पुष्प जिमखाना येथे निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमी (एनजीसीए) आणि युनायटेड क्रिकेट क्लब यां मध्ये दोन दिवशीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या तीन सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. हा पहिला सामना युनायटेडने पहिला डावाच्या आघाडीवर जिंकला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या १४ वर्षाखालील निवड समिती चेअरमन राजेंद्र गोटे होते. उद्घाटन निवृत्त पोलीस उपायुक्त रावे यांच्या हस्ते झाले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विनोद पाटील, एनजीसीए कोच निलेश गायकवाड, युनायटेड क्रिकेट क्लबचे कोच चंद्रकांत लोखंडे, पंच म्हणून प्रवीण कुलकर्णी, चिराग शहा, गणेश पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विष्णू गायकवाड यांनी केले.
युनायटेड क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. युनायटेडने पहिला डावात ५१.२ षटकात सर्वबाद १८१ धावा केल्या. यामध्ये श्रीकांत कबाडे ४७ धावा, संभाजी शिंदे ३८ धावा, हर्षद विजापुरेच्या २४ धावांचा समावेश आहे. एनजीसीए पार्थ राठोडने १७ धावात तीन बळी, ऋग्वेद पाटील सहा धावा दोन बळी सोहम कुलकर्णी १६6 धावा दोन बळी व श्रवण माळी, अनुज वाल्मिकी, आनंद शेंडे यांनी प्रत्येकी एकेक बळी घेतला.
प्रत्युत्तरात एनजीसीएचा पहिला डाव २४.३ षटकात सर्वबाद ७९ धावांवर संपुष्टात आला. यामध्ये रणवीरसिंग बुमरा २४ धावा, पार्थ राठोड २४ धावा, कृष्णा चाकोतेने ११ धावा केल्या. युनायटेडकडून हर्षद विजापुरेने १९ धावात ४ बळी, सम्राट बोबडे सहा धावा दोन बळी, निखील माळीने २४ गावात एक बळी घेतला. दुसऱ्या गावात युनायटेडने ६५.२ षटकात सर्वबाद १६३ धावा केल्या. यामध्ये हर्षदीप साठे ५६ धावा, संभाजी शिंदे ३५ धावा, हर्षद विजापुरे १६ धावा, श्रीराज गवळी १३ धावांचा समावेश आहे. आनंद शेंडे याने २२ धावात चार बळी, सोहम कुलकर्णीने ३० धावात तीन बळी, अनुज वाल्मिकीने १० धावात दोन बळी घेतले.
एनजीसीएने दुसऱ्या डावात ४१ षटकात ७ बाद १६७ धावा केल्या. यामध्ये आनंद शिंदे नाबाद ७१ धावा, सोहम कुलकर्णी ५९ धावा, पार्थ राठोड १२ धावा, यशराज टेकाळेने नाबाद १४ धावा केल्या. सम्राट बोबडे १७ धावात एक बळी, यश लोंढे १९ धावात दोन बळी, संभाजी शिंदे, श्रीराज गवळी यांनी प्रत्येकी एकेक बळी घेतला. हा सामना युनायटेडने पहिला डावाच्या आघाडीवर जिंकला.
या सामन्यासाठी वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. यामध्ये उत्कृष्ट फलंदाज संभाजी शिंदे, उत्कृष्ट गोलंदाज आनंद शेंडे व सामनावीर आनंद शेंडे यांना पुरस्कार देण्यात आला आहे. पंच म्हणून चिराग शहा, प्रवीण कुलकर्णी तर गुणलेखक म्हणून गणेश पवार यांनी काम पाहिले.