
कार्तिकी देशमुखचा संघात समावेश
कन्या न्यूज नेटवर्क ||
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विघापीठ क्रिकेट संघात रागिणी वुमेन्स क्रिकेट क्लबच्या अंजली चिट्टे, कार्तिकी देशमुख या महिला खेळाडूंची निवड झाली आहेत. अंजली चिट्टे हिच्याकडे सोलापूर विद्यापीठ महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या दोघीही रागिणी वुमेन्स क्रिकेट क्लबच्या खेळाडू आहेत.
अंजली चिट्टे हिने यापूर्वी सोलापूर जिल्हा क्रिकेट संघाची कर्णधार होती. तिने अनेकदा महाराष्ट्र कॅम्प, विघापीठ, व स्कूल नॅशनलच्या संघातून खेळली आहे. यामध्ये तिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. कार्तिकी देशमुख जिल्हा क्रिकेट संघाकडून खेळलेली आहे. ती महाराष्ट्र कॅम्पला गेली असून, आता प्रथमच तिची निवड सोलापूर विद्यापीठ संघात निवड झाली आहे.

त्यांना रागिणी वुमेन्स क्रिकेट क्लबचे संस्थापक मल्लिनाथ याळगी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. रागिणी वुमेन्स क्रिकेट क्लबकडून आतापर्यंत खेळणाऱ्यांमध्ये किरण नवगिरे ही भारतीय क्रिकेट संघाकडून सध्या खेळत आहे. तसेच ती आयपीएलमध्येही खेळत आहे. महाराष्ट्र संघात संचिता सपाटे खेळत आहे. प्रसिध्दी जोशी स्कूल नॅशनल खेळली आहे विघापीठ संघाकडून रागिणी वुमेन्स क्रिकेट क्लबच्या अनेक मुली खेळल्या आहेत.
महाराष्ट्र कॅम्पमध्ये अनेकदा या मुली खेळल्या आहेत. ऋतू भोसले ही विघापीठ संघाची सतत तीनवेळा कर्णधार होती. जिल्हा संघाची कर्णधारही होती. रागिणी क्लबची आतापर्यंत कर्णधार होती आहे. नेपाळ संघाविरुद्ध खेळताना ती भारतीय संघाची दोनवेळा कर्णधार होती. आता लववकरच श्रीलंकेला हा संघ जाणार आहे.
रागिणी वुमेन्स क्रिकेट क्लबमध्ये २०१६ पासून मुलींना मोफत क्रिकेट प्रशिक्षण दिले जात आहे. आताही निरंतर मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. तरी स संधीचा सोलापुरातील महिला खेळाडूंनी लाभ घ्यावा. त्यांना क्रिकेटमध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत. त्यांचे यामध्ये करिअर होऊ शकते, असे रागिणी वुमेन्स क्रिकेट क्लबचे संस्थापक मल्लिनाथ याळगी यांनी सांगितले.
रागिणी वुमेन्स क्रिकेट क्लबकडून आतापर्यत भरपूर क्रिकेट सामने खेळवण्यात आले आहे. आतापर्यंत मध्य प्रदेश, पंजाब, दिल्ली, तेलंगणा, वरंगल, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये रंघाचे क्रिके सामने खेळवण्यात आले आहेत. नेपाळमध्ये दोनवेळा या संघातील मुलींना दोनवेळा खेळवण्यात आले आहे. महाराष्ट्रमध्ये पुणे, मुंबई, अंबेजोगाई, धाराशिव, बार्शी आदी ठिकाणी सामने खेळवले गेले आहेत.