वैयक्तिक, घरगुती कारणास्तव पद सोडले : भूषण जाधव
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर: सोलापूर महापालिकेचे क्रीडा अधिकारी भूषण जाधव यांनी राजीनामा दिला आहे. भूषण जाधव यांनी दि. १५ जुलै २०२५ रोजी वैयक्तिक, घरगुती कारणास्तव सोलापूर महानगर पालिका क्रीडा अधिकारी या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा अर्ज संबंधित महापालिका प्रशासन, आयुक्तांकडे लेखी स्वरुपात सुपूर्द केल्याचेही सांगितले. त्यांचा राजीनामाही मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शालेय क्रीडा स्पर्धांना लवकरच प्रारंभ होत आहे. अशा परिस्थितीमध्ये महापालिका क्रीडा अधिकाऱ्यांचा राजीनामा, त्यामुळे या शालेय क्रीडा स्पर्धांचे एकूणच वेळापत्रक कोलमडेल की काय? अशी भीती अनेक क्रीडा शिक्षकांनी व्यक्त केली आहे.