शहरातील अनेक सीएनजी गॅस, पेट्रोल पंपावर गॅस भरण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी
अन टाईम मॅनेजमेंटच बिघडून जाते :
सोलापुरतील सीएनजी गॅस पंपावरील वाढती गर्दी स्थानिक रिक्षावाले, वाहतूकदरांसाठी सध्या डोकेदुखी ठरत आहे. सीएनजी गॅस पंपावर तासानतास वेळ घालविणे सध्या परवडत नसल्याचे राजू सरवदे या रिक्षा वाल्याने कन्या न्यूजशी बोलताना सांगितले.
स्थानिक वाहनधारक, रिक्षा चालकांची कोंडी: सध्या सोलापूर शहर व परिसरात परराज्य आणि पर जिल्ह्यातील वाहनधारकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक वाहनधारक, रिक्षा चालकांची कोंडी मोठी कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. तासनतास स्थानिकाना सीएनजी गॅस पंपावर ताटकळत बसावे लागते. त्यामुळे रिक्षाधारकांच्या व्ययसायवर देखील परिणाम होत असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
By Kanya News
सोलापूर: पंढरीच्या आषाढी एकादशी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर व परिसरातील अनेक पेट्रोल पंपावर सीएनजी गॅस भरण्यासाठी बुधवारी सकाळपासूनच मोठी गर्दी दिसून आली. शहरातील अनेक सीएनजी गॅस पंपावर गॅस भरण्यासाठी वाहनाच्या रांगाच्या रांगा लागल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. पेट्रोल पंप आणि गॅस पंपावर तर गर्दी होतीच, शिवाय समोरील, शेजारील रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर रिक्षा, कारसह अनेक वाहनाच्या रांगा दिसून आल्या. त्यामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांना अडथला निर्माण होत होता. अनेक पेट्रोल पंप, सीएनजी गॅस पंपाचे चालक-मालक यांनी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून स्वतःचे कर्मचारी तैनात, नियुक्त केले होते. त्यामुळे वाहतुकीची होणारी मोठी कोंडी रोखली जाण्यासाठी प्रयत्न केले जात होते. खरच त्यांचे कौतुकही करावेसे वाटले.
भवानी पेठ, मड्डी वस्ती, दयानंद कॉलेज रोड परिसरातील पेट्रोल पंपावर चारचाकी, तीनचाकी रिक्षा, ट्रॉली अशा अनेक वाहनांच्या रांगा दिसून आल्या.दरम्यान, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमार्गें जाणार्या परराज्य आणि पर जिल्ह्यातील वाहनधारकांची मोठी गर्दी दिसून आली. रिक्षा धारकांचीही मोठी गर्दी होती. आज बुधवारी सकाळपासूनच शहरातील विविध पेट्रोल पंपावर सीएनजी गॅस भरण्यासाठी गर्दी होती.शहरात नेहमीच गस तुटवडा असतो. त्या
मुळे वाहनाची अशी गर्दी होत असल्याचे काही वाहनधारकांनी कन्या न्यूजशी बोलताना सांगितले.
सीएनजी गॅस पंप वाढविण्याची मागणी: सोलापूर शहर व परिसरात सीएनजी गॅस पंप आणखी वाढविले पाहिजेत, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. सोलापूर शहरातील बोरामणी नाका, भवानी पेठ, एसटी स्टँड, सिव्हील परिसर, अक्कलकोट रोड, हैदराबाद रोड, विजापूर रोड, पुणे रोड आदी भागात सीएनजी गॅस पंपाची सुविधा असतानाही मोठ्या प्रमाणावर सीएनजी गॅसचा तुटवडा सोलापूर शहराला जाणवत आहे. यावर उपाययोजना म्हणजे सीएनजी गॅस पंपाची संख्या वाढविणे होय.