आदित्य बिर्ला मेमोरियल व्यापार सहयोग केंद्र; सोलापूर  जिल्ह्याला प्रथमच मान

कन्या न्यूज  नेटवर्क ||

सोलापूर : अखिल भारतीय माहेश्वरी महासंघ संचलित आदित्य बिर्ला मेमोरियल व्यापार सहयोग केंद्राच्या जिल्हा निमंत्रकपदी चंद्रकांत तापडिया यांची निवड करण्यात आली. तापडिया यांच्या रूपाने सोलापूर जिल्ह्याला प्रथमच जिल्हा निमंत्रकपदाचा मान मिळाला आहे.

महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महासभेच्या कार्य समितीची बैठक सातारा येथे नुकतीच झाली. यावेळी ही निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मधुसूदन गांधी, उपाध्यक्ष रामेश्वर लाहोटी, महामंत्री सत्यनारायण सारडा यांच्या हस्ते नूतन जिल्हा निमंत्रक चंद्रकांत तापडिया यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष जवाहर जाजू, दिनेश मंत्री, किरण राठी, माजी अध्यक्ष सतीश चरखा, दिनेश सोमाणी, ओमप्रकाश तापडिया, राजगोपाल चंडक, गिरीश जाखोटिया यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact