श्री चैतन्य टेक्नो स्कूलमध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा उत्साहात साजरा
By Kanya news
सोलापूर : श्री चैतन्य टेक्नो स्कूल येथे आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्मिणी पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी विठ्ठल प्रतिमेचे व पालखीचे पूजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका पी. सौजन्या यांच्या हस्ते करण्यात आले.
या निमित्ताने इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदूंग, चिपळ्यांच्या गजरात नृत्यातून वारकरी परंपरेचे दर्शन घडविले. काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी व विविध संतांची वेशभूषा परिधान करून या दिंडीची शोभा वाढविली. याप्रसंगी सर्व विद्यार्थी विठ्ठल विठ्ठल जय हरी” आणि “विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला” असा जयघोष करत दिंडीत सहभागी झाले. याप्रसंगी सर्व विद्यार्थी बाळगोपाळांनी वारकरी सांप्रदायाच्या वेशभूषात टाळ मृदंगाच्या गजर करीत दिंडी यात्रा अनुभवली. विठ्ठल रुक्मिणी यांची पालखी व विविध संतांची वेशभूषा केलेले विद्यार्थी आणि केशरी झेंडे यांनी प्रशालेच्या वातावरण एकूणच भक्तिमय झाले होते.