सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांची प्रकट मुलाखत घेणार ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी

२४ जुलै रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजन

By Kanya News |

सोलापूर: शंभरपेक्षा अधिक आरोपींना जन्मठेप आणि दोघांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवून कायद्याचा धाक अबाधित ठेवणारे सोलापूरचे सुपुत्र, सोलापूर जिल्हा सरकारी वकील तथा सी.बी.आय.चे विशेष सरकारी वकील ad.  प्रदीपसिंह मोहनसिंह राजपूत यांची प्रगट हा कार्यक्रम होणार आहे.

ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी हे राजपूत यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. हा कार्यक्रम बुधवार, दि. २४ जुलै २०२४ रोजी सायं. ६.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे होणार आहे. असे  ॲड प्रदीपसिंह राजपूत मित्र परिवाराच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *