स्पर्धेसाठी २१ कंचीपट्टू साडी बक्षिसाच्या स्वरुपात देणार
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सेवालाल फाउंडेशनच्यावतीने बुधवार, दि. १० ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता कर्णिक नगर येथील वल्याळ क्रीडांगण येथे ब्रतुकम्मा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडाभारती, पद्मशाली सखी संघम, पद्मसेना प्रतिष्ठान, लेट्स डान्स अकॅडेमी या सहयोगी संस्थांच्या विद्यमाने हा कार्यक्रम आयोजिला आहे.
ब्रतुकम्मा महोत्सवासाठी मोफत प्रवेश असून, यामध्ये फक्त मुली आणि महिला सहभागी होऊ शकतात. ब्रतुकम्मा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी लाल, हिरवा, पिवळ्या या तीन रंगांची साडी (पडू साडी) सहभागी मुली व महिलांनी परिधान करावयाचे आहे. प्रत्येक सहभागी सभासदांना भेट वस्तू देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी २१ कंचीपट्टू साडी बक्षिसाच्या स्वरुपात देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी लता म्याकल (९५८८६९७३८३), कल्पना अर्शनपल्ली (९३०९१३०५८८), ममता बोलाबत्तीन (८९२८३७५५२२), मेघा इट्टम (९३७०४५४५४९) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी केले आले.