भक्ती गायकवाडची भरतनाट्यम नृत्य विशारद परीक्षेत केंद्रात बाजी
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापूरच्या भक्ती गायकवाडने भरतनाट्यम नृत्य विशारद परीक्षेत केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई यांच्यावतीने नोव्हेंबर- २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या भरतनाट्यम विशारद या परीक्षेत भक्ती गायकवाड हिने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
भरतनाट्यममधील प्रारंभिकपासून विशारद पूर्ण पर्यंतच्या सर्व परीक्षा तिने तिच्या मातोश्री अर्थात शिवभक्ती नृत्यालयाच्या नृत्य गुरु अश्विनी जाधव- गायकवाड (एम.ए.,विशारद ) यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले आहे.
भक्ती गायकवाड सध्या पुणे येथील कमिन्स कॉलेजमध्ये कॉम्पुटर सायन्स इंजीनियरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.