येत्या ५ ऑक्टोबरला सोलो, सुगल आणि समूह नृत्य स्पर्धांचे आयोजन
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : भगिनी समाजाच्यावतीने शारदोत्सव: २०२४-२०२५ निमित्त सोलो, सुगल आणि समूह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भगिनी समाजाच्यावतीने ट्रस्टी अध्यक्षा विशाला दिवाणजी यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा कार्यक्रम भगिनी समाजाच्यावातीने छत्रपती रंगभवन, सोलापूर येथे दि. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित केला आहे.
सोलापुरातील सर्व भगिनींना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, म्हणून त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. भगिनी समाज ही संस्था सोलापुरातील सर्वात नावाजलेली, महिलांनी महिलांच्या मनोरंजनासाठी तयार केलेली सोलापूरची सर्वात पहिली महिला संस्था म्हणून प्रचलित आणि कार्यरत आहे. या संस्थेचे जवळपास ६०० हून अधिक सदस्य आहेत. याची स्थापना सन १९३७ साली झाली आहे. सन २०२४-२५ या चालू वर्षांसाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्टच्या अध्यक्षा विशाला दिवाणजी आहेत. तसेच उपाध्यक्ष निर्मला कणगी, सचिवा सुवर्णा कटारे, कार्यकारी अध्यक्षा विजया म्हमाणे, कार्यकारी उपाध्यक्षा सुलभा रहाणे, कार्यकारी सचिवपदी राखी हैनाळ या कार्यरत आहेत. विश्वस्त म्हणून सहसचिवा प्रभा कोडले, खजिनदार तिलोत्तमा बाबा, विश्वस्त म्हणून प्रिती वाघ, बिनिता चव्हाण या कार्यरत आहेत. कार्यकारी मंडळात कार्यकारी सहसचिवा म्हणून आरती कुसगल, कार्यकारी खजिनदार किरण अंकुशराव, अर्चना पवार, पल्लवी वाले, अपर्णा कोळी, सुवर्णा परदेशी, सल्लागार म्हणून अंजली नानल या कार्यरत आहेत.
नवरात्रीच्या काळात दुर्गेचे नवनवीन रूप आपण पाहतो. त्याचीच काहीशी रूपे एकत्र येऊन अनुभवता यावीत आणि त्यातून मनोरंजन व्हावे, या हेतूने भगिनी समाज यंदाही शारदोत्सव हा कार्यक्रम साजरा करीत आहे.
सोलो नृत्य, सुगल नृत्य आणि समूह नृत्य अशा तीन विविध गटांत विभागणी केली आहे. अधिक माहितीसाठी पार्क चौकातील भगिनी समाज येथील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.