प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे

उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिम्मित उपक्रम

By Kanya News

सोलापूर : उपमुख्यमंत्री अजितदादा  आणि  प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे  यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय १४ व १७ वर्षाखालील आंतरशालेय मुला-मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा अक्कलकोट रोडवरील पुंजाल क्रीडांगणावरील एसएसआयच्या बास्केटबाल मैदानावर शनिवार, दि. २० आणि रविवार, दि. २१ आयोजित करण्यात येणार आहे. १७ वर्षाखालील मुलांमध्ये दोनच संघ आल्यामुळे या गटामध्ये सोलापुरातील संस्थेच्या संघांना प्रवेश देण्यात येणार आहे. सर्व प्रशिक्षकानी १७ वर्षाखालील मुलांचे संघ असतील तर सहभाग नोंदवण्यास हरकत नाही, असे संयोजक विद्या प्रतिष्ठान, सोलापूर व स्पर्धा संयोजक  रमीज कारभारी, अब्दुल्ला चौधरी यांनी कळविले आहे.  स्पर्धेचे ड्रॉ शुक्रवार, दि. १९ रोजी सायंकाळी सात वाजता  पुंजाल क्रीडांगणावर  काढण्यात येणार आहे. तरी खेळाडूची यादी व प्रवेश फी घेऊन प्रशिक्षकांनी उपस्थित रहावे. तरी ज्या शाळेच्या संघाला भाग घ्यावयाचा आहे, अशा संघांनी अब्दुल्ला चौधरी  (९५७९६६६३३६) व रमीज कारभारी (७५०७४१९४१९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विजयी, उपविजयी संघाला चषक देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact