सोलापूर बार असोसिएशनमध्ये श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापूर बार असोसिएशनमध्ये संत सद्गुरू श्री सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि प्रार्थनेसह आरती करण्यात आली. सुरुवातीला अध्यक्ष ॲड. विजय पी. शिंदे यांनी सेवालाल महाराजांचे जीवनचरित्र आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. सचिव ॲड. मनोज पामुल यांनी संत सेवालाल हे केवळ संतच नाही तर थोर क्रांतिकारी विचारवंत उत्कृष्ट संघटक आणि महापराक्रमी युद्ध असल्याचे सांगितले. तसेच बंजारा समाजावर झालेला अन्याय आणि हा समाज कोणापुढेही न हार न मानता लढत राहून स्वतःचे अस्तित्व टिकवल्याचे सांगितले.
याप्रसंगी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड . विजय पी. शिंदे, सचिव ॲड. मनोज ना. पामुल, सहसचिवा ॲड. निदा अ. सैफन, खजिनदार ॲड. विनयकुमार सी. कटारे, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. रोहिदास पवार, माणिक राठोड, संजय गायकवाड, संजय चव्हाण, संजय पवार, सरकारी वकील रमेश राठोड, सुरेश गायकवाड, सहदेव भडकुंबे, मळसिद्ध देशमुख, संतोष राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.