दि. २४ जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन; सेवासदन प्रशालेत बालिका संवाद कार्यक्रम
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : केंद्र शासनाकडून दरवर्षी दि. २४ जानेवारीला ‘राष्ट्रीय बालिका दिवस’ साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो सोलापूर यांच्यावतीने शुक्रवार, दि. २४ जानेवारी रोजी सायंकाळी ४.०० वाजता सु.रा. मुलींची प्रशाला, सेवासदन येथे बालिका संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शासनाकडून विशेष बालिकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनाविषयी माहिती, आरोग्य संवाद, निबंध स्पर्धा आणि बक्षीस वितरण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय संचार ब्युरोचे सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी दिली आहे.
बालिकासोबत संवाद करण्यासाठी महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, बाल सरंक्षण अधिकारी रेश्मा गायकवाड आणि मुख्याध्यापिका राजश्री रणपिसे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
देशातील मुलींना सक्षम, शिक्षित आणि स्वावलंबी बनवणे हा या दिनामागचा खास उद्देश असून देशातील मुलींना त्यांचे अधिकार आणि हक्क यांबाबत जागृत करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.