प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार : नोकरीत असणाऱ्या व्यक्तींनी ऑटोरिक्षा परवाने तत्काळ जमा करावेत 

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर :  सरकारी, निमसरकारी, खाजगी कंपनी अथवा संघटीत क्षेत्रातील इतर कोणत्याही संस्थेत उद्योगात नोकरीमध्ये असणाऱ्या व्यक्तींनी ऑटोरिक्षा परवाना प्राप्त केला असल्यास अथवा परवाना प्राप्त केल्यानंतर ते नोकरीत रूजू झाले असल्यास अशा व्यक्तींनी दि. १५ फेब्रुवारी २०२५ पुर्वी त्यांचे ऑटोरिक्षा परवाने प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथे स्वेच्छेने जमा करावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी केले आहे.

 प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रामध्ये  ऑटोरिक्षा परवाना संख्या मर्यादित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय शासन अधिसुचना दि. १७ जून २०१७ अन्वये  विखंडीत केल्याने, सध्या खुले ऑटोरिक्षा परवाना धोरण राबविण्यात येत आहे.

ऑटोरिक्षा परवाना धारण करताना अथवा परवाना धारण केल्यावर परवानाधारक सरकारी, निमसरकारी, खाजगी कंपनीत अथवा संघटीत क्षेत्रातील इतर कोणत्याही संस्थेत, अद्योगात नोकरी नसावेत अशी प्राधिकरणाची अट आहे. या अनुषंगाने शासन निर्णय दि. १७ जुलै २०१७ मधील अनुक्रमांक ३ नुसार अर्जदारास तो सरकारी, निमसरकारी, खाजगी कंपनी अथवा संघटीत क्षेत्रातील इतर कोणत्याही संस्थते, उद्योगात नोकरी करीत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील. असे विहित करण्यात आलेले आहे.

अशा पध्दतीने धारण केलेले ऑटोरिक्षा परवाने निदर्शनास आल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायदा व प्राधिकरणाने विहित केलेल्या तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असेही  प्रादेशिक परिवहन अधिकारी  नेरपगार यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact