जुळे सोलापुरात ऑटो डॉग फीडरच्या पहिल्या प्रयोगाची सुरुवात
by kanya news ||
सोलापूर : मुक्या प्राण्यांची सेवा करणे आणि चार पायांच्या आपल्या मित्रांसाठी सोलापुरातील काही तरुण एकत्र आले. त्या त रुणांनी एकत्रित येऊन मोकाट आणि भटकंती श्वानांसाठी आता ऑटो डॉग फीडर अर्थात त्यांना अन्न-खाद्य पुरविणारी “फूड बँक”ची सेवा सुरु केली आहे. यशवंत राऊत, सोहम पावले, राहुल बिराजदार, चेतन पाटील, प्रवीण राऊत या तरुणांनी सोलापुरात हा एक आगळा-वेगळा उपक्रम राबविण्याचा संकल्प केला. त्याचा शुभारंभदेखील रविवारी करीत आहेत.
सोलापुरातील काही तरुणांनी एकत्रित येऊन मोकाट आणि भटकंती श्वानांसाठी आता ऑटो डॉग फीडर अर्थात फूड बँक- अन्न-खाद्य बँकची सेवा सुरु केली आहे. अशी माहिती यशवंत राऊत, सोहम पावले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील रस्त्यावरील भटकंती श्वानांच्या समस्येवर उपाययोजना म्हणून ऑटो डॉग फीडरचे उद्घाटन रविवार, दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९ वाजता पतंजली शो-रूमजवळ, डीमार्ट रोड, जुळे सोलापूर येथे होणार आहे. या कार्यक्रमात रस्त्यावरील श्वानांसाठी अन्न उपलब्ध करून देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, याबद्दल माहिती दिली जाईल.
या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलकोट संस्थानचे राजे श्रीमंत मालोजीराजे भोसले, पोलीस आयुक्त एम. राजकुमार हे उपस्थित राहणार आहेत. या विशेष उपक्रमात सहभागी होऊन-रस्त्यावरील श्वानांची काळजी घेण्याची संधी सर्वांना मिळेल.
सध्या सोलापूरमध्ये भटकंती श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, ज्यामुळे भटकंती श्वानांना अन्न मिळवण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून सोलापूरच्या तरुणांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून रस्त्यावरील भटकंती श्वानांसाठी ‘ऑटो डॉग फीडर’ ही यंत्रणा बसवली जाणार आहे, ज्यामुळे श्वानांना पौष्टिक अन्न मिळेल आणि अन्नासाठी होणारे भांडण कमी होतील.
या अभियानात सहभागी होण्यासाठी आणि मदतीचा हात पुढे करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. मोकळी जागा उपलब्ध करून दिल्यास तिथे हे फीडर बसवता येतील. शिवाय, नागरिकांना या अभियानात सहभाग घेण्यासाठी पॅकबंद खाऊ देण्याचे आव्हान केले आहे, त्यातून आलेल्या अन्न खाऊ घातले जाईल, आणि त्याबद्दलची माहिती व्हिडिओद्वारे दिली जाईल.
सोलापूरमधील या उपक्रमामुळे रस्त्यावरील भटकंती श्वानांसाठी आवश्यक अन्नाची सोय होणार आहे, कोणता ही प्राणी कधीच स्वतःहून नुकसान व त्रास देत नाही आणि श्वान हा मानवाचा सगळ्यात जवळचा मित्र मानला जातो. त्यामुळे ही जागरुकता निर्माण करून सामाजिक परिवर्तन घडवण्यास मदत होईल. आपल्या घरातील पाळीव श्वान मित्रांना सोबत आणून, सोलापूरला चार पायांच्या मित्रांसाठी एक सुरक्षित स्थान बनवण्यासाठी सहाय्य करा. या अन्न बँकेविषयी अधिक माहितीसाठी यशवंत राऊत (९९२३५७३२९) सोहम पावले (९९२३३०६६२५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला राहुल बिराजदार, यशवंत राऊत, सोहम पावले, चेतन पाटील, प्रवीण राऊत उपस्थित होते.